आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, १० डिसेंबर, २०२३

पेणच्या गणेशमूर्तीना मिळाले जीआय मानांकन

गडब( अवंतिका म्हात्रे)पेण येथील गणेशमूतीना जोआप मानांकन मिळाले आहे. त्यामुळे पेणच्या गणेश मूर्तीची नक्कल करून ती मूर्ती पेणची असल्याचे सांगून गणेश भक्तांची फसवणूक करणा-यांना चाप बसला आहे. पेणमध्ये तयार होणाऱ्या गणरायाच्या भूतींना भौगोलिक मानांकन (जोआप टंग) मिळण्यासाठी चेत्रईच्या जीआय नोंदणी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. आता गणेशमूतींना मानांकन मिळाल्यामुळे त्याचा फायदा जागतिक स्तरावर होणार आहे. 
 [[भविष्यात जगभरातून पेणच्या गणेशमूतींना जास्त प्रमाणात मागणी वाढेल.पेणच्या गणेशमूर्ती सांगून मुंबई, ठाणे, पुणे, नागपुर या महानगरांमध्ये सर्रास गणेशभक्तांची फसवणूक होताना दिसते. मात्र या व्यवसायामध्ये काम करताना त्या मूर्ती पाहूनच त्या पेणच्या मुर्ती नसल्याचे समजायचे. आता मानांकन मिळाल्याने आम्ही फसवणूक करणाऱ्यांवर नक्कीच आक्षेप घेऊ. तसेच कारवाईचीही मागणी करू. मानांकन मिळाल्याने सर्व गणपती व्यवसायिक आनंदी आहेत. ]] -अजित लागी, मूर्तीकार श्री गावदेवी कला केंद्र

भौगोलिक मानांकनाचा फायदा
भौगोलिक मानाकनाचं महत्व
पेणच्या गणेशमूर्तीची नकल करुन अथवा नावाचा वापर करुन गणेशभक्तांची कुणीही फसवणूक करू शकणार नाही. तसे केल्यास तर ते कायद्याचं उल्लंघन ठरू शकतं, तसेच यासाठी तीन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि दोन लाखांपर्यंतचा दंड डोठावला जाऊ शकतो.भौगोलिक मानांकनामुळे फसवणुक थांबण्यास मदत होते. भारतात नव्हे तर जगभरात मिळालेले मानांकन त्या-त्या ठिकाणची ओळख निश्चित करते. आज पेणच्या गणेशमूर्तींना हे मानांकन मिळाल्यामुळे मूर्तीच्या मागणीत निश्चितपणे वाढ होईल. तसेच जगप्रसिद्ध गणेशमुर्ती म्हणून प्रसिद्ध असलेल्या पेण शहराची ओळख कुणालाही मिटवता येणार नाही.

आदर्श वार्ताहर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आदिवासी पाड्यावर बालदिन साजरा

मुंबई: कांजूरमार्ग पूर्व येथील एक सेवाभावी संस्था यांच्या वतीने पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांमध्ये जागतिक बालदिन साजरा केला ...