मुंबई : दि ६ डिसेंबर रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर रेल्वे स्थानक जवळ नक्षत्र माॅलच्या बाजूला आधारस्तंभ एकता सामाजिक संस्था (रजि) यांच्या माध्यमातून समस्त दादर फेरीवाले, दुकानदार व रहिवाशी यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, येणाऱ्या अनुयायांना अल्पोपहार वाटप करण्यात आले.
याप्रसंगी आधारस्तंभ फाऊंडेशनचे संस्थापक- अध्यक्ष मा श्री सतिश थोरात यांच्या हस्ते "महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष अंकाचे" लोकार्पण करण्यात आले. तसेच मी बुद्धीस्ट फाउंडेशनचे संस्थापक- अध्यक्ष मा ॲड विश्वास कश्यप आणि बुद्ध धम्म संस्कार संस्था कासार वडवली घोडबंदर रोड ठाणे पश्चिम तसेच आधारस्तंभ फाऊंडेशन यांच्या संयुक्त सहकार्याने अल्पोपहार वाटप करण्यात आले. जेष्ठ समाजसेवक- साहित्यिक व पत्रकार श्री शशिकांत सावंत, साहित्यिक मोहन जाधव, पत्रकार श्री संतोष सावंत, आणि सामाजिक कार्यकर्ता- साहित्यिक व कवी श्री विलास देवळेकर यांनी "महापरिनिर्वाण दिनानिमित्त कविता" सादर केली. हा उपक्रम यशस्वी राबविण्यासाठी, आधारस्तंभ व दुकानदार आणि रहिवासी तसेच इतर सामाजिक महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा