आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, ६ जानेवारी, २०२३

गौरव जहागीरदार यांना कामोठे भूषण पुरस्कार

कामोठे ( प्रतिनिधी ) रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि   सुषमा पाटील विद्यालय जुनिअर कॉलेज व सिनियर कॉलेज कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने वरिष्ठ पत्रकार गौरव जहागीरदार यांना त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाबद्दल  कामोठे भूषण पुरस्कार  जाहीर झाला आहे अशी माहिती सुषमा पाटील विद्यालयाचे  मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मंदार पनवेलकर यांनी दिली.

दि. ४ जानेवारी  रोजी सुषमा पाटील विद्यालयात चाललेल्या   कामोठे  कला क्रीडा महोत्सवामध्ये त्यांना हा पुरस्कार लोकनेते रामशेठ ठाकूर, यांच्या हस्ते आमदार प्रशांत ठाकूर आणी श्री परेश ठाकूर आणि मान्यवरांच्या  उपस्थितीत   देण्यात आला . गौरव जहागीरदार यांना कामोठे भूषण पुरस्कार मिळाल्यामुळे सर्व स्तरातून  त्यांचे अभिनंदन होत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (अनामिक मद्यपी) संघटनेचे 10 जून 2026 रोजी होणार 92 व्या वर्षात पदार्पण !!

(संकलन : सुनील आय. 9096949029) ************************** अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस अर्थात ए.ए.(अनामिक मद्यपी )संघटना ही विश्वव्यापी ...