सागवे ( महादेव गोळवसकर)- रत्नागिरी जिल्हा परिषदेची राजापूर तालुक्यातील सागवे काञादेवी येथील प्राथमिक शाळेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष मंगळवार दिनांक १० जानेवारी व बुधवार, दिनांक ११ जानेवारी २०२३ रोजी जि.प.सागवे- काञादेवी येथे साजरे करण्यात येत आहे. सन १९७३ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या प्राथमिक शाळेत पहिली ते चौथी पर्यंत वर्ग आहे. शाळेत ६२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सेमी इंग्रजी माध्यम आहे.शाळेत बारा - पंधरा किलोमीटर दूर वरून विद्यार्थी येतात.शाळेचा शिक्षण क्षेत्रातील आलेख चढत्या क्रमाने आहे.दर वर्षी शाळेचा निकाल शंभर टक्के लागतो.चार विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक मिळाले आहे.शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण घाडीगावकर यांना रत्नागिरी जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.त्यामध्ये रंगमंच नाम फलकाचे अनावरण ,कृषी विषयक सेंद्रिय शेती मार्गदर्शन,मोफत आरोग्य शिबीर,रांगोळी प्रदर्शन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासमयी लक्ष्मीकांत कुलकर्णी,शेखर सावंत,गोविंद बने,डाॅ.प्रथमेश नलावडे,प्रमोद बने,सरपंच - सोनाली पुकरूल आणि राजापूर तालुक्यातील शिक्षण विभागातील अनेक मान्यवर अधिकारी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लक्ष्मीकांत कुलकर्णी,संजय राणे,चंद्रकात देवरूखकर इत्यादी मेहनत घेत आहेत अशी माहीती मुख्याध्यापक लक्ष्मण घाडीगावकर यांनी दिली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
संजय दिना पाटील यांच्या पाठपुराव्याला यश, भांडुप स्टेशन परिसर होणार मोकळा, बेस्ट चौकीच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन संपन्न
मुंबई (प्रतिनिधी): भांडुप रेल्वे स्थानक मार्गावरील वाहतूक कोंडी, नागरिकांची गैरसोय व वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर ...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा