मुंबई : मराठी वृत्तपत्र लेखक संघ, महाराष्ट्र राज्य या राज्यस्तरीय संस्थेच्या वतीने वृत्तपत्र लेखक श्याम ठाणेदार यांना राज्यस्तरीय पत्रभूषण पुरस्कार २०२३ हा मानाच्या पुरस्कार देऊन सन्मानित केले आले. मराठी वृत्तपत्र लेखक संघ महाराष्ट्र राज्य या संस्थेचा २२ वा वर्धापन दिन तसेच पत्रकार दिनाचे औचित्य साधून ६ जानेवारी रोजी मुंबईतील मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात राज्यातील वृत्तपत्र लेखकांचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात श्याम ठाणेदार यांना संजय केळकर (आमदार, ठाणे ) सुकृत खांडेकर ( मुख्य संपादक दैनिक प्रहार ) तसेच संस्थेचे, संस्थापक अध्यक्ष एकनाथ बिरवटकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी जगन्नाथ हेगडे ( माजी नगरपाल मुंबई ) हेमराज बागुल ( संचालक, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनाय महाराष्ट्र राज्य ) सुहास बिऱ्हाडे ( ब्युरो चीफ दैनिक लोकसत्ता ) आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज्यभरातील पत्रकार, संपादक, वृत्तपत्र लेखक तसेच सामाजिक क्षेत्रांत काम करणारे मान्यवर मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. श्याम ठाणेदार हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध वृत्तपत्र लेखक असून ते महाराष्ट्रातील विविध वर्तमानपत्रात लेखन करतात. विविध विषयांवरील त्यांचे हजारो लेख विविध वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले असून महाराष्ट्रभर त्यांचा वाचकवर्ग आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन मराठी वृत्तपत्र लेखक संघ महाराष्ट्र राज्य या संस्थेने पत्रभूषण २०२३ हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे. श्याम ठाणेदार यांना याआधीही विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे त्यात मुंबईतील अभिजित राणे फाउंडेशनने त्यांना राज्यस्तरीय पत्रभूषण पुरस्कार तसेच सूनिर्मल फाउंडेशनने राज्यस्तरीय आदर्श स्तंभ लेखक पुरस्काराने गौरविले आहे. पुण्यातील ज्ञानसंकल्प समाजीक संस्थेतर्फे त्यांना राज्यस्तरीय आदर्श साहित्य सेवा पुरस्काराने गौरविले आहे. साप्ताहिक भगवे वादळने त्यांना प्रबोधनकार ठाकरे पुरस्काराने गौरविले आहे. छत्रपती संभाजी महाराज नगर ( औरंगाबाद ) येथील एआयएफएस वैद्यकीय समितीने त्यांना राज्यस्तरीय आदर्श लेखक पुरस्काराने गौरविले आहे. याशिवाय पंढरपूर वृत्तपत्र लेखक संघ, सोलापूर वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई वृत्तपत्र लेखक संघांनी त्यांना राज्यस्तरीय आदर्श वृत्तपत्र लेखक म्हणून गौरविले आहे. धाराशिव येथे झालेल्या जिल्हा स्तरीय साहित्य संमेलनात ते प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. श्याम ठाणेदार यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
खान्देशनी अहिराणी बोलीला गुगलनी मान्यता ; अहिराणी मायबोलीसाठी अभिमाननी घडी- प्रा.विकास पाटील
कल्याण : ( प्रतिनिधी - सुनिल इंगळे ) खान्देशनी मातीनी गोडवा,संस्कृतीनी ओळख आनि लोकजीवननी आत्मा म्हंजे अहिराणी बोली. वर्षानुवर्ष...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा