आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, २४ जून, २०२२

जनजागृती सेवा समितीच्या वतीने कल्याणच्या शशांक बालविहार विद्यालयास शैक्षणिक साहित्याचे वाटप

कल्याण(गुरुनाथ तिरपणकर)-दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर यावर्षी महाराष्ट्रातील सर्व शाळा सुरु झालेल्या आहेत.मुलांमध्ये प्रचंड उत्साह आहे.याच अनुषंगाने जनजागृती सेवा समिती,महाराष्ट्र या सामाजिक संस्थेच्यावतीने कल्याण येथील शशांक बालविहार विद्यालयातील विद्यार्थ्यांना वही,पेन,पेन्सिली,कलर बाॅक्स,पेंटींग बुक,खोडरबर,शार्पनर,पट्टी,फोल्डर अशा स्वरूपात शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. जनजागृती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर,समितीच्या सह खजिनदार सौ श्रुती उरणकर ,समिती ग्रुप सदस्या सौ.सविता ठाकुर,सौ.सुनिता मिश्रा,जाॅईट मिट डाऊन सहेलीच्या उपाध्यक्षा सौ.करुणा कातखडे,संविधान सैनिक संघाच्या अध्यक्षा सौ.सुनिता जगदीश खैरनार,मुख्याध्यापिका सौ.चंद्रलेखा गायकवाड(शिक्षिका),कवियत्री सुरेखा गावंडे,शब्दसुमन संस्था तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्थेच्या कल्याण तालुका अध्यक्षा अनिता कळसकर आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ.करुणा कातखडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शशांक बालविहार विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व कल्याणी वाक्कर,प्रकाश वाक्कर यांनी विशेष परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पाली भाषेत मुनी म्हणजे मन आणि वर म्हणजे राजा ज्याने स्वतःचा मनाला जिंकले आहे तो मनाचा राजा झाला अशी जगातील एकमेव व्यक्ती बुद्ध होय - सुगंध भिवा कदम

मुंबई  (रामदास धो. गमरे) तथागत गौतम बुद्धांच्या समता, शांती, मैत्री या संदेशाची जगातील सर्वच विद्वानांना जाणीव झाली म्हणूनच ब्रह्मदेशातील रं...