उरण -राज्यातील रक्ताची गरज असलेल्या थँलेसेमिया रुग्णांना रक्ताचा तुटवडा प्रचंड प्रमाणात भासत असून अश्या रुग्णांचे रक्ताअभावी जीवन संकटात आहे.रक्ता अभावी अनेकांना मृत्यूला देखील सामोरे जावे लागले आहे. अशा या थँलेसेमिया रुग्णांची रक्ताची अडचण दूर करण्याचा उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत साई वेताळ स्पोर्ट्स ग्रुप, कळंबुसरे यांच्या सौजन्याने आणि समर्पण ब्लड बँक, घाटकोपर यांच्या सहकार्याने श्री रामनवमी चे औचित्य साधून श्री. साईबाबा मंदिर, कळंबुसरे, तालुका उरण येथे रविवार दि 10 एप्रिल 2022 रोजी स. 10:00 ते दुपारी 3:00 या वेळेत विशेष रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.सदर रक्तदान शिबिराचे उदघाटन साई मंदिर वहाळचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते रवीशेठ पाटील, रायगड भूषण राजू मुंबईकर यांच्या हस्ते झाले.यावेळी पालवी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष परशुराम भोईर, स्टेप आर्ट डान्सचे पप्पू सूर्यराव,ग्रामपंचायत सदस्य सुषमा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.रुग्णांना मदत म्हणून सामाजिक बांधिलकीच्या नात्याने सर्वांनी या सामाजिक उपक्रमात भाग घेऊन रक्तदान केला.एकूण 52 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिरात सुप्रसिद्ध डान्स कलाकार रायगड भूषण पपन पाटील, गोरख ठाकूर, साईकृपा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी चे राकेश पाटील, कवियत्री हेमाली ताई यांच्याबरोबरच जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनी सप्तनीक रक्तदान करून सर्वांसमोर एक चांगला उत्तम आदर्श ठेवला.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साई वेताळ स्पोर्ट्स ग्रुप,कळंबुसरेचे अध्यक्ष नंदकुमार बळीराम पाटील,सदस्य डॉ शैलेश पाटील, नरेश पाटील, स्वप्नील पाटील, हर्षद पाटील, रणजित पाटील, अजित पाटील, प्रतीक म्हात्रे, सुयोग पाटील, शुभम पाटील, रमेश म्हात्रे, क्षितिज म्हात्रे, प्रभुश्वर म्हात्रे, यतिश भेंडे, जितेंद्र भेंडे, गुरुनाथ पाटील, साई वेताळ स्पोर्ट्स ग्रुपचे इतर सदस्य, समर्पण ब्लड बँकेचे जनसंपर्क अधिकारी प्रकाश आयवळे, कर्मचारी कविता भालेराव, अरविंद विश्वकर्मा तसेच समर्पण ब्लड बँकचे उपस्थित कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. प्रसिद्ध निवेदक सुनिल वर्तक यांनी सूत्रसंचालन आणि निवेदनाबरोबरच रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली. एकंदरीत रक्तदान शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
मंगळवार, १२ एप्रिल, २०२२
साई वेताळ स्पोर्ट्स ग्रुप कळंबूसरे आयोजित रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद

याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
गारगाई प्रकल्पग्रस्तांचे सुंदर गाव वसवा.. दलालांना दूर ठेवा
गारगाई प्रकल्प कोणत्याही परीस्थीतीमधे पूर्ण करायचाच, असा निर्धार महाराष्ट्र शासनाने केलेला दिसतोय. म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (प्रतिनिधी): वाॅशिंग्टन डी.सी. (यू.एस्) येथील नामांकित Cederbrook University कडून मानवी आभामंडळ व विश्र्लेषण या विषयावरील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा