उरण (विठ्ठल ममताबादे )हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख मा. श्री आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशाने रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी शिवसेना द्रोणागिरी शहर संपर्कप्रमुख पदी कल्पेश विष्णू पाटील यांची नियुक्ती जाहीर केली आहे.
आपण शिवसेना पक्षाच्या ध्येय धोरणाना अनुसरून वाटचाल करून शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी, पक्ष बांधणीसाठी आणि विस्तारासाठी नेहमीच प्रयत्नशील राहावे. अशा शुभेच्छा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी यावेळी दिल्या.
माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या उरण शहर कार्यालयात माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते हे नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, उरण शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, उपशहरप्रमुख प्रतीक पाटील, युवासेना शहरप्रमुख करण पाटील, शहर सचिव धनंजय शिंदे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील, शाखाप्रमुख सेक्टर 30 स्वराज तोटे, रुपेश पाटील, उपजिल्हायुवती अधिकारी कु रविना ठाकूर, उपतालुका युवती अधिकारी कु बेबी ठाकूर, उपतालुका युवती अधिकारी कु अंकिता घरत व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा