आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, १२ एप्रिल, २०२२

सत्कर्म फाउंडेशनच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप

मुंबई : घाटकोपर मधील कै. तुळशिराम सावते विद्यालय व ठाणे येथील केदारनाथ विद्यामंदिर या शाळांना सत्कर्म फाउंडेशनच्या वतीने  शालेय उपयोगी  साहित्याचे वितरण करण्यात आले. यामध्ये सिलिंग फॅन , ट्यूब लाईट (एलईडी), ग्रीन ब्लॅकबोर्ड , व्हाॅईट  ब्लॅकबोर्ड , मार्कर पेन इत्यादी शालेय उपयोगी साहित्याचे संच स्वरुपात सत्कर्म फाउंडेशनच्या वतीने वितरण करण्यात आले. कार्यक्रम आयोजनासाठी श्री. दत्तात्रय सावंत सर  आणि श्री मुक्तादेवी सेवाभावी संस्था मुंबई यांचे विशेष सहकार्य लाभले. 
               शालेय उपयोगी साहित्याचे वितरण शिवव्याख्याते तुकाराम साळुंखे सर , महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष ज्ञानदेव हांडे सर , आयकर विभागाचे अधिकारी खेमजी भागीत साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.   
              सत्कर्म फाऊंडेशनचे संचालक एडवोकेट अनुज नरूला साहेब , समाजसेवक तथा सत्कर्म फाऊंडेशनचे संचालक दत्तात्रय सावंत सर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. तसेच डॉक्टर ओम प्रकाश गजरे साहेब , कै. तुळशिराम सावंत विद्यालयाचे मुख्याध्यापक धनंजय काळे सर , केदारनाथ विद्या मंदिरच्या संचालिका श्रीमती कालींदा गायकवाड मॅडम ,  एस.जी. टिटोरियलचे संचालक मारुती जाधव सर , योगा प्रशिक्षिका सौ. श्रावणी हांडे मॅडम , एस जी प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका स्वाती जाधव मॅडम , सत्कर्म फाऊंडेशनच्या सदस्या सौ. तारामती भागीत मॅडम , विविध सेवाभावी संस्थांचे पादाधिकारी यांच्यासह विद्यार्थ्यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पत्रकारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानात दोन दिवसांचे आंदोलन

मुंबई (सतिश पाटील ): राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ (भारत सरकार मान्यता प्राप्त) यांच्या मार्फत पत्रकारांच्या प्रश्नांकडे तसेच ...