भांडुप - श्री साई सेवाभावी संस्था, भांडुप टेंबीपाडा यांच्या वतीने मोफत पुस्तक वाचनालयाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक पुण्य विचारचे मुंबई प्रतिनिधि, शिक्षक आणि समाजसेवक श्री सुरेश पाटील सर, समाजसेवक, प्रसिद्ध वकिल श्री संतोष महामुनी सर आणि समाजसेवक श्री महेंद्र कदम उपस्थित होते.
सदर वाचनालयात शैक्षणिक, ऐतिहासिक, प्रबोधनात्मक, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन अशा विविध विषयांवर आधारित ५०० पुस्तके लोकसहभागातून उपलब्ध करण्यात आली आहेत.यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजेश मोरे, कार्याध्यक्ष अनंत पालेकर, व्यवस्थापक भास्कर घाग, सेक्रेटरी निलेश शिंदे, सुरेश धनावडे, सौ श्वेता शेखर गावडे, सौ ज्योत्सना महेश कांबळे उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वाचनालय प्रतिनिधी ज्योती वारंग, प्रांजल मोरे, सेजल घाग, जागृती राणे, आकांक्षा धनावडे आणि अमिषा पाळेकर या बालमित्रांनी विशेष मेहनत घेतली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा