आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २१ मार्च, २०२२

नातू महाविद्यालयात ऑनलाईन आंतरराष्ट्रीय वेबिनारचे यशस्वी आयोजन

मार्गताम्हाने : येथील डॉ तात्यासाहेब नातू कला व वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्या वतीने एथीक्स अँड डायलॉजिक टिचिंग मेथडॉलॉजि इन हायर एज्यूकेशन  या विषयावरती आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते . डॉ नातू महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्या वतीने भवन्स कॉलेज मुंबई, सिनियर कॉलेज लांजा आणि आय सी एस कॉलेज खेड या महाविद्यालयातील इंग्रजी विभागांबरोबर सामंज्यस्य करार करण्यात आले आहेत. या अंतर्गत नातू महाविद्यालय मार्गताम्हाने,भवन्स कॉलेज मुंबई व लांजा कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि 19/03/2022 रोजी सायंकाळी 4:00 वाजता आयोजित करण्यात आलेल्या  आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये डॉ एल्हाम हुसेन ढाका सिटी कॉलेज ढाका बांगलादेश यानी एथीक्स इन एज्यूकेशन : रिस्पॉन्सीबीलिटीज ऑफ टीचर्स अँड स्टुडंटस इन द एज ऑफ डीजीटलायझेशन या विषयावरती उपस्थितांना मार्गदर्शन केले . एथीक्स आणि एज्युकेशन यांच्या विधायक युतीने समाजाची विधायक प्रगती होते असे विशद केले.तर डॉ शिवाजी सरगर इंग्रजी विभाग मुंबई विद्यापीठ मुंबई यांनी डायलॉजिक टिचिंग मेथडॉलॉजि अँड इंटरपर्सनल रिलेशनशिप बिट्वीन टीचर्स अँड स्टुडन्टस या विषयावरती उपस्थितांना मार्गदर्शन केले . शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधील सुयोग्य समन्वय शिक्षणासाठी संजीवनी असते. आपल्या सादरीकरणा मध्ये डॉ सरगर यांनी आपले गुरु डॉ ए पी पांडे तर संशोधक विद्यार्थी डॉ राजेश माळी, डॉ सुरेश सुतार, डॉ सुनील गोंधळी यांच्या अनुभवाला स्थान देऊन शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील समन्वयाचा एक वेगळा अनुभव उपस्थितांना दिला.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिया वैद्य तर प्रश्न उत्तर कार्यक्रमाचे नियोजन ध्रुमी सिंग भवन्स कॉलेज मुबंई यांनी केले, वेबिनारचे प्रास्ताविक डॉ राव इंग्रजी विभाग भवन्स कॉलेज मुंबई यांनी केले उपस्थित संशोधक प्राध्यापकांची ओळख अनुक्रमे डॉ राजीव कांबळे इंग्रजी विभाग प्रमुख लांजा कॉलेज व प्रा प्राजक्ता शिंदे नातू कॉलेज मार्गताम्हाने यांनी केले. कार्यक्रमासाठी विनिता रामटेके सिद्धी पडवेकर डॉ नातू कॉलेज, प्राची पांचाळ लांजा कॉलेज ऐश्वर्या पोनुगोटी भवन्स कॉलेज मुंबई यांनी या वेबिनारविषयी आपले अनुभव सांगितले.

    उपस्थित मान्यवरांबरोबरच डॉ शिवपुत्र कानडे विश्वभारती रिसर्च सेंटर लातूर यांचे विशेष आभार डॉ सुनील गोंधळी भवन्स कॉलेज मुंबई यांनी मानले या वेबिनारला  जगभरातून बहुसंख्येने प्राध्यापक आणि संशोधक विद्यार्थी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

महिला व बाल विकास विभाग(​महाराष्ट्र शासन)सखी एक थांबा केंद्र (वन स्टॉप सेंटर) यांच्या वतीने “हर घर तिरंगा २०२६” अभियानांतर्गत आयोजित उपक्रमाचा व ओएससी (OSC) माहिती सत्राचा यशस्वी समारोप

मुंबई : महिला व बाल विकास विभाग(​महाराष्ट्र शासन)सखी एक थांबा केंद्र चेंबूर, मुंबई उपनगर (वन स्टॉप सेंटर) यांच्या वतीने “हर घर ...