आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, ७ मार्च, २०२२

जागतिक महिला दिनानिमित्त सोहम फाउंडेशन तर्फे महिलांसाठी हेल्थ किट वाटप ; नील्स लेक व्ह्यू सोसायटी व सोहम फाउंडेशनतर्फे महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन


पनवेल:  नील्स लेक व्ह्यू सोसायटी, खांदा कॉलनी आणि सोहम फाउंडेशन खांदा कॉलनी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.६ मार्च रोजी  जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सोहम फाउंडेशन तर्फे महिलांसाठी हेल्थ किटचे वाटप करण्यात आले. नील्स लेक व्ह्यू सोसायटीचे चेअरमन व्यंकटेश अण्णा, सोहम फाउंडेशनच्या अध्यक्षा मंजिरी गणेश मुळे, सचिव अँड आश्लेषा मुळे, रुमा घोष, कीर्ती कुलकर्णी, रचना त्रिपाठी, प्रविणा आनंद यांच्यासह आदींनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पुढाकार घेतला. यावेळी महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रश्नमंजुषा, वक्तृत स्पर्धा, नृत्य स्पर्धा याप्रकाराच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला होता. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पाली भाषेत मुनी म्हणजे मन आणि वर म्हणजे राजा ज्याने स्वतःचा मनाला जिंकले आहे तो मनाचा राजा झाला अशी जगातील एकमेव व्यक्ती बुद्ध होय - सुगंध भिवा कदम

मुंबई  (रामदास धो. गमरे) तथागत गौतम बुद्धांच्या समता, शांती, मैत्री या संदेशाची जगातील सर्वच विद्वानांना जाणीव झाली म्हणूनच ब्रह्मदेशातील रं...