आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २० फेब्रुवारी, २०२२

श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे कार्य कौतुस्कापद - रविंद्र पाटील

उरण (विठ्ठल ममताबादे )- दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शनिवार दि.१९/२/२०२२ रोजी तारखेप्रमाणे श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थे तर्फे शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात गव्हाण नागपाडा येथे पार पडला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले एन आर आय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांनी शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून शिवप्रतिमेचे पूजन केले.व आयोजित केलेल्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था नेहमी विविध सामाजिक उपक्रम राबवित असते. सामाजिक कार्यात निरपेक्षपणे काम हि संस्था करीत आहे. पोलीस प्रशासनाला सुद्धा या संस्थेचे नेहमी सहकार्य असते असे सांगत श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे कार्य कौतुस्कापद आहे असे गौरवोदगार वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांनी काढले.शिवजयंती निमित्त सकाळी ०९.०० वा दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन, ९.३० वा.छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा, १०.०० वा.भजन सेवा एकविरा आई भजन मंडळ (गव्हाण),११.०० वा. बाळ कलाकारांचे वेशभूषा स्पर्धा असे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.वेशभूषा स्पर्धेत प्रथम क्रमांक - सानवी कोळी (सावित्रीबाई फुले), द्वितीय क्रमांक - स्तुती कोळी(झाशीची राणी),तृतीय क्रमांक - मिहिर कोळी( कोळी बांधव)यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

   एन आर आय पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील,श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील,चंदन महाराज,उपाध्यक्ष हेमंत पवार,सचिव प्रेम म्हात्रे,अभय पाटील,प्रकाश म्हात्रे, खजिनदार सुरज पवार, सामाजिक कार्यकर्ते सुनील वर्तक,माधव म्हात्रे,प्रितम वर्तक,शुभम ठाकूर,हेमंत ठाकूर,नितेश पवार,आकाश पवार,कल्पेश कोळी,राज पवार समिर पाटील, अतुल म्हात्रे, आरुषी म्हात्रे, यश म्हात्रे आदी मान्यवर, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे पदाधिकारी सदस्य यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

जॉय सामाजिक संस्थेकडून १०० गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात ; किराणा किट व शैक्षणिक साहित्याचे वाटप, प्रेरणादायी संवादातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची नवी उमेद

मुंबई : समाजातील वंचित विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा आणि शिक्षणाची नवी उमेद जागविण्याचा सुंदर उपक्रम जॉय सामाजिक ...