आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २० फेब्रुवारी, २०२२

शिवजयंती निमित्त स्वच्छता अभियान

उरण (विठ्ठल ममताबादे )-जेष्ठ नागरिक मंडळ आणि लिवी टीमच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त उरण तालुक्यातील मुळेखंड कोळीवाडा आणि कुंभारवाडा (चाणजे उरण )येथे संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियाना अंतर्गत गावात सामाजिक बांधिलकी जपत साफसफाई करण्यात आली. यावेळी जेष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश म्हात्रे, कार्याध्यक्ष अनंत पाटील, लिवी टीमचे सीईओ जुगनू कोळी, एचओडी हंडोरे सर, प्रोफेसर किरण घुमारे, लिवी टीमचे सर्व मेंबर, गाव अध्यक्ष जयराज म्हात्रे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. लिवी टीम व जेष्ठ नागरिक मंडळ यांच्या वतीने शिवजयंती दिनी स्वच्छताचे कार्य केल्याने या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

जॉय सामाजिक संस्थेकडून १०० गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात ; किराणा किट व शैक्षणिक साहित्याचे वाटप, प्रेरणादायी संवादातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची नवी उमेद

मुंबई : समाजातील वंचित विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा आणि शिक्षणाची नवी उमेद जागविण्याचा सुंदर उपक्रम जॉय सामाजिक ...