आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, १३ जानेवारी, २०२२

विजय भोईर यांनी मिळवून दिला दिव्यांग महिलेला न्याय

उरण- जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनी अनेक गोरगरिबांना न्याय मिळवून दिला आहे. ते नेहमी निस्वार्थी वृत्तीने अनेकांना मदत करतात याचेच जिवंत उदाहरण म्हणजे उरण तालुक्यातील भेंडखळ गावातील दिव्यांग कु.छाया हरी ठाकूर हिला मिळवून दिलेला न्याय.

  सविस्तर वृत्त असे की हरी पुंडलिक ठाकूर राहणार -भेंडखळ हे कुंडेगाव जिल्हा परिषद शाळेतून मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाल्यानंतर अवघ्या 2 वर्षातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी कृष्णाबाई हरी ठाकूर यांना स्वर्गीय मुख्याध्यापक हरी पुंडलिक ठाकूर यांची पेन्शन सुरु झाली. मात्र काही वर्षातच कृष्णाबाई यांचे निधन झाले. पती पत्नी यांचा दोघांचाही मृत्यू झाला. त्यांना चालू असलेली पेन्शन बंद झाली. ही पेन्शन त्यांची मुलगी छाया हरी ठाकूर राहणार -भेंडखळ ही दिव्यांग व अविवाहित असल्याने तिला ते पेन्शन व इतर सेवा सवलती मिळाव्यात अशी जनतेतून व ठाकूर कुटुंबियांकडून मागणी होऊ लागली. पेन्शन व इतर सेवा सवलती मिळाव्यात यासाठी दिव्यांग व अविवाहित असलेल्या छाया ठाकूर हिने प्रयत्न सुरु केले.वडिलांचे पेन्शन व सेवा सवलती मिळाव्यात यासाठी तीने उरण पंचायत समिती येथे वेळोवेळी पाठपुरावा केला.मात्र तिला दाद मिळाली नाही. तेंव्हा छाया ठाकूर हिने त्यांचे भाऊ नरेश ठाकूर यांच्याशी संपर्क साधला. व तीने ही समस्या  जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांच्या कानावर ही समस्या टाकण्यास सांगितली. लगेचच नरेश ठाकूर यांनी ही समस्या विजय भोईर यांच्या कानावर टाकली. लगेचच विजय भोईर यांनी हा प्रश्न हाती घेतला. रायगड जिल्हा परिषदेत सर्व शासकीय अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्यासमोर ही समस्या मांडली. छाया ठाकूर ही 70% अपंग व अविवाहित आहे. तीचे आईवडीलांचे निधन झाले आहे. तिला कोणाचाच आधार नसल्याने तीच्या वडिलांचे पेन्शन व इतर सुविधा दिव्यांग छाया ठाकूर हिला मिळावेत अशी मागणी विजय भोईर यांनी जिल्हा परिषदेत केली. कायद्यानुसार ज्या व्यक्तीचे आई वडीलांचे निधन झाले असेल आणि त्यांचे अपत्य हे दिव्यांग व अविवाहित असेल तर कायद्याने आई किंवा वडिलांचे सर्व सेवा सवलती या त्या अपत्यला मिळणे बंधनकारक आहे. जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनी संबंधित परिपत्रक (GR) दाखवून आपला शिवसेनेचा आक्रमकपणा दाखविला. शेवटी रायगड जिल्हा परिषदेने छाया ठाकूर यांना पेन्शन व इतर सेवा सवलती देण्याचे मान्य केले.तसे ठरावही जिल्हा परिषदेने मंजूर केले. शिवसेना गोरगरिबांच्या नेहमी पाठीशी असते याचा प्रत्यय ठाकूर कुटुंबियांना आला असून छाया ठाकूर यांना जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांच्या मुळे पेन्शन मंजूर झाली. शिवाय 2007 सालापासूनची थकबाकी सुद्धा विजय भोईर यांनी मिळवून दिली आहे. सदर थकबाकी दिनांक 5/1/2022 रोजी तीच्या खात्यावर जमा सुद्धा झाली आहे. हा विषय विजय भोईर यांनी उचलून धरला नसता तर छाया ठाकूर हिला आज न्याय मिळाला नसता त्यामुळे विजय भोईर व जिल्हा परिषद अध्यक्ष, सर्व सदस्य, सर्व संबंधित प्रशासकीय अधिकारी व ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले त्या सर्वांचे दिव्यांग छाया ठाकूर, नरेश ठाकूर यांनी आभार मानले आहे.मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, माजी आमदार तथा रायगड जिल्हा शिवसेना प्रमुख मनोहर भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सतत पाठपुरावा करून एका दिव्यांग महिलेला न्याय मिळवून दिल्याचे व गोरगरिबांचे प्रश्न सोडविण्याचे आमचे कर्तव्यच असल्याचे विजय भोईर यांनी यावेळी सांगितले.जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून माझ्यासारख्या अनाथ व गोरगरीब असलेल्या सर्वसामान्य दिव्यांग महिलेला न्याय मिळवून दिला आहे.मी त्यांचे आयुष्यभर ऋणी आहे. त्यांनी न्याय मिळवून दिल्याने त्यांचे उपकार नेहमी माझ्यावर असतील या शब्दात दिव्यांग छाया ठाकूर यांनी विजय भोईर यांचे आभार मानले.या सर्व घटनेवरून शिवसेना नेहमी गोरगरिबांच्या पाठीशी असते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

तेजस्वी निवाते यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार

मुंबई(गणेश हिरवे) बोरिवली पूर्व येथील अभिनव शिक्षण मंदिर येथील शिक्षिका तेजस्वी निवाते यांना नुकताच जॉय ऑफ गिविंग संस्थेच्या वतीने आदर्श शिक...