आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २३ जानेवारी, २०२२

वारकरी संप्रदायामुळे नव्या पिढीला कळत आहेत परंपरा अन् संस्कार --पालकमंत्री कु.आदिती तटकरे


अलिबाग-  वारकरी संप्रदाय नसता तर आजची नवी पिढी भरकटली असती. या पिढीला खऱ्या अर्थाने परंपरा, संस्कार काय असतात हे वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून माहीत होत आहे. आजच्या काळात भगवंताला मानणारी कोणतीही व्यक्ती रस्त्यावरून दिंडी जात असताना नकळतपणे नतमस्तक होते, असे राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड कु. आदिती तटकरे आज खालापूर येथे म्हणाल्या.

       महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषद यांच्या विद्यमाने 10 वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील देवन्हावे येथील नोव्हाटेल इमॅजिका या ठिकाणी दि.22 व 23 जानेवारी 2022 हे दोन दिवस आयोजित करण्यात आले असून या संमेलनास राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड कु.आदिती तटकरे यांनी शुभेच्छा देण्यासाठी  भेट दिली,त्यावेळी त्या बोलत होत्या.

       यावेळी वारकरी परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील (काकाजी) दिनेश डिंगले, खासदार श्रीरंग बारणे, सुनील पाटील, वारकरी व अन्य मान्यवर कोरोना नियमांचे तंतोतंत पालन करीत उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

शिक्षकांच्या पाठीशी पंचायत समिती खंबीर; करंजाडी गणात 'एआय' तंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देणार!

मुठवली येथे करंजाडी गणाची पहिली शैक्षणिक आढावा बैठक संपन्न! गडब(अवंतिका म्हात्रे) : महाड तालुका पंचायत समितीचे सर्व अधिकारी व शि...