आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २४ जानेवारी, २०२२

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त चिरनेर मध्ये विविध उपक्रम उत्साहात संपन्न

उरण (विठ्ठल ममताबादे )-हिंदुहृदयसम्राट  शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची ९६ वी जयंती शिवसेना-युवासेना शाखा चिरनेर,भोम शाखेतर्फे शिवधन पतसंस्थेच्या श्रीमान बाळासाहेब ठाकरे सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी आयोजित केलेल्या 

    कोविड लसीकरण व युनिव्हर्सल पास वाटप मोहिमेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.चिरनेर मेल-फिमेल प्रसिद्ध गायक मोहन फुंडेकर व विवेक केणी यांच्या सुमधुर आवाजात देशभक्तीपर गाण्यांचा कार्यक्रमही मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

    हिंदुहृदयसम्राट  शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंतीनिमित रविवार दिनाकं २३ जानेवारी २०२२ रोजी शिवसेना शाखा चिरनेर-भोम यांच्या सौजन्याने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन व भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली व तब्बल ३५० नागरिकांना कोविडशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात आले व २०० नागरिकांना युनिव्हर्सल पास वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला.या कार्यक्रमास उद्योगपती राजाशेठ खारपाटील, उरण प.स.उपसभापती शुभांगीताई पाटील, शिवसेना उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, माजी उरण प.स.सदस्य भास्कर मोकल, ग्राहक संरक्षण कक्ष प्रमुख शशांक ठाकूर, शिवधन पतपेढीचे चेअरमन गणेश म्हात्रे, महिला संघटक ज्योती म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य धनेश ठाकूर, धर्मेंद्र म्हात्रे, किशोर भगत, रमेश फोफेरकर, प्रतिक्षा मोकल,संध्या नारंगीकर, विनंती फुंडेकर, माजी उपसरपंच समाधान ठाकूर, हरिश्चंद्र फोफेरकर, श्रीधर पाटील, बबन गोंधळी, माजी ग्रामपंचायत सदस्य अलंकार परदेशी, व्हा.चेअरमन गजानन वशेणीकर व चिरनेर शाखाप्रमुख सचिन म्हात्रे, भोम शाखाप्रमुख सदानंद पाटील, शिवधन पतपेढी संचालक प्रभाकर ठाकूर, विजय फोफेरकर, विलास ठाकूर, विलास भगत, शुभांगी महाले, संध्या पाटील  व सर्व जेष्ठ शिवसैनिक, युवासैनिक,हितचिंतक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

शिक्षकांच्या पाठीशी पंचायत समिती खंबीर; करंजाडी गणात 'एआय' तंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देणार!

मुठवली येथे करंजाडी गणाची पहिली शैक्षणिक आढावा बैठक संपन्न! गडब(अवंतिका म्हात्रे) : महाड तालुका पंचायत समितीचे सर्व अधिकारी व शि...