आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, ९ जानेवारी, २०२२

जासई हायस्कूल मध्ये नूतनीकरण केलेल्या मुख्याध्यापक कक्ष, अटल टिंकरिंग लॅब व पाणपोई चा उद्घाटन समारंभ संपन्न


उरण (विठ्ठल ममताबादे )- उरण तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा.पाटील ज्युनिअर कॉलेज दहागाव विभाग जासई या  शैक्षणिक संकुलातील नूतनीकरण केलेल्या मुख्याध्यापक कक्ष, अटल टिंकरिंग लॅब व पाणपोई चे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे जेष्ठ मॅनेजिंग कौन्सिल सदस्य,लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते शुक्रवार दिनांक 6/1/2022 रोजी संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षिय मनोगतात त्यांनी शाळेच्या होत  असलेल्या विकास व भरभराटी बद्दल समाधान व्यक्त करून कौतुक केले .तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक  अरुण घाग व उपशिक्षक  म्हात्रे डी.बी.या पुरस्कार प्राप्त गुणवंतांचा सत्कार केला. तसेच विद्यालयातील विविध स्पर्था परीक्षेत चमकलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या हस्ते बक्षिसे देऊन त्यांना प्रोत्साहित केले.

       या जासई हायस्कूल च्या विकासात रामशेठ ठाकूर यांचा मोठा मोलाचा वाटा आहे.या पूर्वी विद्यालयाच्या अनेक अडी - अडचणी त्यांनी सोडविल्या आहेत. त्या प्रमाणे आता ही अडी - अडचणी समजून घेऊन विद्यालयाच्या प्रांगणातील जुनी मोडकळीस आलेल्या इमारतीचे नवीन बांधकाम करण्यासाठी भरीव मदतीचे आश्वासन अध्यक्ष रामशेठ ठाकूर यांनी दिले.

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर व विद्यालयाचे मुख्याध्यापक  अरुण घाग यांनी केले.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आणि उद्योगपती जे.एम.म्हात्रे यांनी पाणपोई चे उद्घाटन करून आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व कामगार नेते  सुरेश पाटील यांनी विद्यालयाच्या प्रगतीचा चढता आलेख आपल्या मनोगतातून व्यक्त करून शाळेच्या विकासा साठी मदत करण्याचे वचन दिल्या बद्दल अध्यक्ष व प्रमुख पाहुण्या विषयी कृतज्ञता व्यत केली.तसेच या प्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर  प्रमोद कोळी यांनी शाळेच्या कामाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या .

      या समारंभासाठी रयत शिक्षण संस्थेचे रायगड विभागीय अधिकारी ठाकूर आर.पी, सहाय्यक विभागीय अधिकारी फडतरे एस. एस,विद्यालयाचे चेअरमन अरुण जगे,रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर रवींद्र भोईर,जासई ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष घरत,  अमृत ठाकूर,मधुकर पाटील,व्हॉईस चेअरमन  रामभाऊ घरत,स्थानिक सल्लागार समिती व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य,शिक्षण प्रेमी ग्रामस्थ,उपमुख्याध्यापक श्री.मोरे, पी.पी.पर्यवेक्षक  साळुंखे आर. एस,सर्व सेवक वर्ग व विदयार्थी  कोविड नियमांचे पालन करून उपस्थित होते . या कार्यक्रमाचे सूत्र संचालन रयत सेवक संघाचे समन्वयक नुरा शेख यांनी केले आभार प्रदर्शन गुरुकुल प्रमुख म्हात्रे जी.आर.यांनी केली.वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

देव फाउंडेशनचा नवी मुंबई महानगरपालिकेच्या अडवली भूतावली शाळेत विद्यार्थी सहाय्य उपक्रम संपन्न

नवी मुंबई(वैभव पाटील)  मुंबईच्या देव फाउंडेशन यांच्या वतीने नवी मुंबईतील अडवली भूतावली येथील महागरपालिकेच्या शाळा क्...