आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, २० जानेवारी, २०२२

आदत से मजबूर

 मानसिकता बदलता येऊ शकते का ? तर त्याचं उत्तर खरं तर नाही असंच आहे कुणाची मानसिकता आपण कशी बदलू शकतो? पण ती बदलण्याची नितांत गरज आज निर्माण झाली आहे .

    आता हेच पहा ना सेक्स सारखा विषय उघडपणे बोलण्यास संवाद साधण्यास आपल्याकडे सामाजिक मज्जाव आहे . नीरोध विकत घेताना  आजूबाजूला कुणी नाही ना! हे पाहून दुकानदाराला सांकेतिक खूण केली जाते मग तो ही पेपर मध्ये गुंडाळुन तुम्हाला देतो अरे ! तो नीरोध विकत घेतो याचा अर्थ तो कुंटणखाण्यातच चाललाय, लफडी करायला चाललाय असा होत नाही. त्याला त्याच्या घरी पाळणा सुध्दा लांबवायचा असू शकतो तसेच आपल्याकडे महिलांचे सॅनिटरी पॅड सुध्दा पेपर मध्ये लपेटून दिले जातात अरे! कळू द्या ना इतरांना... की हे वापरणं किती काळाची गरज आहे ते! का लपवायचं?

   अशीच मानसिकता काहींच्या नजरेच्या बाबतीत असते असे लोकं आपल्याला मित्रांमध्ये कमेंट पास करताना दिसतात अरे! बघ काय आयटम चाललीय बॉल बघ डिक्कि बघ वगैरे वगैरे ... अरे ती बघ स्लीव्हलेस भाबी तिच्या ब्रा ची पट्टी बघ सॉलिड रे!...अरे हा काय चघळन्याचा विषय आहे का ? हे वासनांध नजरेनेच करतात बलात्कार तिच्यावर...अहो! जगात अश्या कितीतरी मनुष्य जाती-प्रजाती आहेत की त्यातील महिला ब्रा तर सोडा ब्लाऊज सुद्धा घालत नाहीत पदरा प्रमाणे एखादें फडके असते खांद्यावर मग त्या लोकांची मानसिकता का नाही ढासळत? मध्ये त्या अभिनेत्री हेमांगी कवी ने एकदम सिंपल घरात पोळ्या करतानाचा विडिओ सोशीअल मीडियावर टाकला तर ट्रोलर च्या नजरा पोळीकडे नाही! तीच्या हलणाऱ्या बुब्स कडे गेल्या अरे...! काय हे...! ह्यात ट्रोलर महिलांचा सुध्दा वाटा  महत्वाचा होता! सुख म्हणजे नक्की काय असतं असं म्हणणाऱ्यांनी सुध्दा प्रतिक्रिया दिल्यात, म्हणे! कॅमेरा जास्त बुब्स एक्सपोझ करत होता पोळी नाही! काय म्हणावं अशांना अश्या मानसिकतेची चीड येते अहो! आपण शिव्या देताना सुध्दा तुझ्या आयची, बहिणीची वगैरे वगैरे ...म्हनून महिलांचाच उद्धार करतो जोक्स, विडंबन, मिम्स हे सुध्दा महिलांवरच जास्त बनवले जातात.

   खरंच ही भिकार मानसिकता बदलायला हवी त्याची सुरवात आपल्यापासूनच करा बघा जमतंय का! पटलं तर घ्या नाहीतर आहेच आपलं येरे माझ्या मागल्या... आणि जोपर्यंत ही वीक्रुत मानसिकता बदलत नाही तो पर्यंत 

बाई बुब्स आणि ब्रा सारख्या मोहिमा होत राहतील आणि असे विषय सारखे चघळले जातील कारण आपण ...

आदत से मजबूर

तूर्तास इतकेच 

©® कवी संदेश भोईर

मोबाईल - 8779540080

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

प्रथम पुण्यस्मरण : कै.विष्णू शंकर पाटील

दोन ओळी बाबासाठी .... बाबा आमचे आधार स्तंभ हरवले .आज राहून राहून डोळ्यात पाणी येते .कोणालाही दुखवले नाहीत. नेहमीच हसत मुख जीवन जगलात ! नेहमी...