आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, ९ जानेवारी, २०२२

हुतात्मा स्मृती दीना निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

उरण (विठ्ठल ममताबादे )-उरण तालुक्यातील हुतात्मा महादेव हिरा पाटील, हुतात्मा केशव महादेव पाटील, हुतात्मा कमळाकर कृष्णा तांडेल, हुतात्मा नामदेव शंकर घरत, हुतात्मा रघुनाथ अर्जुन ठाकूर यांनी 1984 साली देशासाठी दिलेले बलिदान हुतात्मा स्मृतिदिन म्हणून उरण तालुक्यात साजरा केला जातो.या हुतात्मा स्मृती दिनाचे औचित्य साधून जाणता प्रतिष्ठान पागोटे उरण व श्री साई ब्लड सेंटर पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 17/1/2022 रोजी सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत जिल्हा परिषद शाळा पागोटे, तालुका उरण येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामपंचायत पागोटे, ग्रामस्थ मंडळ पागोटे यांच्या सहकार्यातून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त इच्छुक रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन जाणता प्रतिष्ठान पागोटेचे अध्यक्ष विवेक पाटील (संपर्क क्रमांक 97694 86809 ) यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बालसंस्कार व युवक विकासासाठी कार्य करणाऱ्या ममता मसुरकर यांचा गौरव

ठाणे(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर) जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘सर्...