आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, ८ जानेवारी, २०२२

मुंबई विभागीय युवा महोत्सवातील लोकनृत्य प्रकारात रायगड जिल्ह्याचा संघ प्रथम

अलिबाग:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, अंतर्गत उपसंचालक क्रीडा व युवक सेवा मुंबई विभाग तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड यांच्या वतीने युवांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी 15 ते 29 वयोगटातील युवक- युवतींसाठी दि.04 जानेवारी 2022 रोजी मुंबई विभागीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाच्या लोकनृत्य प्रकारात रायगड जिल्ह्याच्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला.  

     केंद्र शासनाच्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या सूचनेप्रमाणे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन आले. या युवा महोत्सवामध्ये लोकगीत व लोकनृत्य या प्रकारांचा फक्त समावेश करण्यात आला होता.  या युवा महोत्सवामध्ये मुंबई विभागातील ठाणे, पालघर, रायगड, मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

     मुंबई विभागीय युवा महोत्सव लोकगीत आणि लोकनृत्य स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्रीमती पुष्पा ताई पागधरे (लता मंगेशकर पुरस्कार प्राप्त गायिका..), श्रीमती ग्लोरिया डिसुझा (सुप्रसिद्ध अभिनेत्री, केंद्र शासनाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर कलाश्री राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त), श्री.नंदकिशोर मसुरकर (सुप्रसिद्ध अभिनेते, केंद्र शासनाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर कलाश्री राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त).

     युवा महोत्सवाचा निकाल पुढीलप्रमाणे- 1) लोकगीत - प्रथम - पालघर जिल्हा, द्वितीय- रायगड जिल्हा आणि तृतीय- मुंबई शहर जिल्हा   2) लोकनृत्य - प्रथम - रायगड जिल्हा, द्वितीय- पालघर जिल्हा आणि तृतीय- मुंबई शहर जिल्हा.

     या सर्व विजेत्यांचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे व जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी अभिनंदन केले व त्यांना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

     महोत्सवाच्या आयेाजनासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड व मुंबई शहर येथील सर्व अधिकारी / कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.


00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

यशवंतराव चव्हाण सेंटर तर्फे कृतज्ञता पुरस्कार २०२५ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

प्रतिनिधी (नवी मुंबई) सुभाष हांडे देशमुख: यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्रा तर्फे प्रतिवर्षी नवी मुंबई कार्यक्षेत्रात उत्कृष्ट कार्य क...