आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, १३ जानेवारी, २०२२

मातोश्री ट्रस्टचे गोव्यातील आरोग्य विषयक कार्य अभिमानास्पद-मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ; मातोश्री ट्रस्ट कडून गोव्यासाठी आरटीपीसीआर किट मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

मुंबई (शांताराम गुडेकर/समीर खाडिलकर ) -स्माईल फाउंडेशन व मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने गोवा राज्यासाठी आलेले कोरोना तपासणीचेआरटीपीसीआर(RTPCR) किट मातोश्री ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त डॉ. मनोज भाऊ चव्हाण यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सुपूर्द केले.गोव्यातील मातोश्री ट्रस्टचे प्रमुख व मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय सागर पन्हाळकर यांच्या पुढाकाराने डॉ. मनोज भाऊ चव्हाण व अमित बने यांच्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांच्या निवासस्थानी खास वेळ राखून ठेवला होता. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेले छोटेखानी कार्यक्रमात हे किट त्यांना सुपूर्द करण्यात आले त्यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी मातोश्री ट्रस्टचे भरभरून कौतुक केले. मी  स्वतः या ट्रस्टचा एक भाग आहे याचा मला अभिमान आहे कारण मातोश्री ट्रस्टचे गोव्यातील जनतेच्या आरोग्य विषयक कार्य खरेच उल्लेखनीय कौतुकास्पद व अभिमानास्पद असेच आहे असे कौतुकोद्गार काढले.मनोज चव्हाण व मुख्यमंत्री यांच्या मधे ट्रस्टच्या पुढील वाटचाली बाबतीत बराच वेळ चर्चा झाली. भविष्यातील कार्य काय असेल कसे असेल त्याबाबतीत मुख्यमंत्री महोदयांनी आवर्जून माहिती घेउन अपेक्षित सर्व काही मदत करण्याचे आश्वस्त करून जनतेच्या वतीने मातोश्री ट्रस्ट व स्माईल फाऊंडेशनचे आभार मानले.या प्रसंगी डॉ. मनोज भाऊ चव्हाण यांचे सोबत सागर पन्हाळकर व ट्रस्टचे विश्वस्त संदीप परब उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

देव फाउंडेशनचा नवी मुंबई महानगरपालिकेच्या अडवली भूतावली शाळेत विद्यार्थी सहाय्य उपक्रम संपन्न

नवी मुंबई(वैभव पाटील)  मुंबईच्या देव फाउंडेशन यांच्या वतीने नवी मुंबईतील अडवली भूतावली येथील महागरपालिकेच्या शाळा क्...