आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, २५ जानेवारी, २०२२

महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय "नारी शक्ती सन्मान पुरस्कार २०२२" साठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

मुंबई (शांताराम गुडेकर)
            ८ मार्च जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करण्यात येतो व या निमिताने ज्यांनी सामजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक,वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे,अशा महिलांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना नारी शक्ती सन्मान पुरस्कार २०२२ देऊन गौरविण्यात येणार आहे.तेव्हा विविष क्षेत्रात उत्कृट सेवा कार्य केलेल्या महिलांनी आपले प्रस्ताव,कार्याचे फोटो,कार्याच्या बातम्या,रावबिलेले,शैक्षणिक,सामाजिक,संस्कृतिक,वैद्यकीय उपक्रम माहिती दि २५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत पाठवावेत असे जॉय ऑफ गिविंग संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.निवडक ११ महिलांना पुरस्कार सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन एप्रिल मध्ये होणाऱ्या कार्यक्रमात गौरविण्यात येईल.परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
पुरस्कारासाठी माहिती जॉय ऑफ गिविंग संस्था,मुंबई C/O गणेश हिरवे,२/१२ पार्वती निवास,बांद्रेकरवाडी,रामनगर जोगेश्वरी पूर्व
मुंबई-४०० ०६० येथे पाठवावी. अधिक माहितीसाठी ९९२०५८१८७८ या भ्रमनध्वनी वर संपर्क साधावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

शिक्षकांच्या पाठीशी पंचायत समिती खंबीर; करंजाडी गणात 'एआय' तंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देणार!

मुठवली येथे करंजाडी गणाची पहिली शैक्षणिक आढावा बैठक संपन्न! गडब(अवंतिका म्हात्रे) : महाड तालुका पंचायत समितीचे सर्व अधिकारी व शि...