आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, २३ डिसेंबर, २०२१

कन्यादान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

अलिबाग:- महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती (नवबौध्दांसह), विमुक्त जाती, भटक्या जमात (धनगर व बंजारीसह), विशेष मागास प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत मागासवर्गीय कुटुंबातील लाभ घेणाऱ्या दांपत्यांसाठी कन्यादान योजना राबविण्यात येते.

     सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होऊन विवाह करणाऱ्या दांपत्यांना अर्थसहाय रु.10,000/- (अक्षरी रु.दहा हजार) देण्यात येते. तसेच सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थाना प्रति जोडपे रु.2 हजार  प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यात येते. 

     गरजू लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सुनिल जाधव यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

प्रथम पुण्यस्मरण : कै.विष्णू शंकर पाटील

दोन ओळी बाबासाठी .... बाबा आमचे आधार स्तंभ हरवले .आज राहून राहून डोळ्यात पाणी येते .कोणालाही दुखवले नाहीत. नेहमीच हसत मुख जीवन जगलात ! नेहमी...