उरण (विठ्ठल ममताबादे )-उरण तालुक्यातील ग्रामपंचायत नवघर येथे नवघर कमान ते भेंडखळ फाटा रस्ता डांबरीकरण करणे, नावघरपाडा येथे पाण्याची पाईपलाईन टाकणे, नवघरपाडा येथे प्रवेशद्वार कमान बांधणे सदरील कामे ही जिल्हापरिषद सेस फंड, जिल्हापरिषद १५वा वित्त आयोग आणि ग्रामपंचायत १४ वा वित्त आयोग या निधींअंतर्गत मंजूर केली होती. स्वागत कमानीचे काम पूर्ण झाले असून त्याचे उद्घाटन व पाण्याची लाईन व रस्त्याच्य कामाचे भूमीपूजन सोमवार दिनांक २७ डिसेंबर २०२१ रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर व काँगेस जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य विजय भोइर, माजी सरपंच दौलत शेठ घरत, माजी उपसभापती महादेव बंडा, सरपंच आरती चौगुले, उपसरपंच रवीशेठ वाजेकर, शेकाप नेते मनोहर बंडा, ग्रामसेवक किरण केनी , शाखाप्रमुख नवघर अविनाश म्हात्रे, शाखाप्रमुख नवघर पाडा विलास जोशी, मनोज पाटील, युवासेना नवघर विभाग प्रमुख चेतन पाटील, उपशाखाप्रमुख विशाल डाके, टेम्पो युनियन अध्यक्ष रवी पाटील, संतोष पाटील, माजी उपसरपंच हितेश भोइर, सुरेश बंडा,सुमती बंडा, जयवंत बंडा, मुकुंद बंडा, प्रशांत बंडा, अतिश बंडा, परेश पाटील, प्रमोद पाटील, दिनेश बंडा, विनोद बंडा, मिलिंद बंडा, किशोर बंडा, महेश पाटील, विनायक बंडा, संदेश भोईर, तसेच शिवसैनिक, शेकाप व काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा