कळंबोली- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष, हिंदुजननायक राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व मनसे नेते अमितसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने रोजगार व स्वयंरोजगार विभाग अध्यक्ष महेंद्र बैसाणे तसेच मनसे व्यापार सेना अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा संघटक रामदास पाटील व व्यापार सेना उपाध्यक्ष नितीन काळे यांच्या आयोजनात "भव्य रोजगार मेळावा" मोठ्या उत्साहात पार पडला. सदर मेळावा रविवार दि. २६ डिसेंबर २०२१ रोजी सुधागड जुनी शाळा, सेक्टर - ३, कळंबोली, जि. रायगड या ठिकाणी आयोजित केला होता. त्याप्रसंगी माजी आमदार व मनसे नेते नितीन सरदेसाई, रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. शांताराम कारंडे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संदीप ठाकूर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन केल्यानंतर रोजगार व स्वयंरोजगार विभागाचा वर्धापन दिन नितीन सरदेसाई यांच्या शुभहस्ते केक कापुन साजरा करण्यात आला.सदर रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत, कळंबोली शहर अध्यक्ष अमोल बोचरे, महीला रायगड जिल्हाध्यक्ष अदितीताई सोनार,रायगड सहकार सेल गिरीश तिवारी,उपशहर प्रमुख विवेक बोराडे, प्रशांत कदम. सचिव राहुल चव्हाण,वाहतूक महानगरपालिका पनवेल पनवेल शहर अध्यक्ष संजय मिरकुटे, उपशहर प्रमुख प्रकाश लाड, योगेश चिले - रस्ते आस्थापना महाराष्ट्र आदी मनसेच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा