आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, ३० ऑक्टोबर, २०२१

एस.टी.सेवा दरवाढीचा परिणाम

इंधन दरवाढीचा प्रश्न जेव्हा निर्माण होतो तेव्हा शासकीय एस.टी.सेवा प्रथम अडचणीत सापडते.इंधन दरवाढ सातत्याने होत राहणार आहे. पेट्रोल ११४ /- रूपये झाले. झालेली दरवाढ केंद्र सरकार- महाराष्ट्र सरकार कमी करण्यासाठी प्रयत्न करीत नाहीत. जनता माञ मुकाट्याने सहन करते.

   एस.टी.दरवाढीचा प्रस्ताव कार्यालयात बसून तयार करणे सोपे आहे. आपण दरवाढी बरोबर प्रवाशांना कोणत्या सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत आणि पुढे देणार आहे हे एस.टी.महामंडळाने प्रवाशांना जाहीरपणे सांगावे.एस.टी.डेपो मधून सुटणार्या गाड्या स्वच्छ कधी साफ करता.एस.टी.डेपो मधील विश्रांती घेण्याची बाकडी कधी स्वच्छ करता.एस.टी.डेपो मधील उपाहारगृहातील पदार्थ रूचकर- चवदार आहेत की नाही हे पाहिले आहे काय ? स्वच्छता असावी म्हणून ठेकेदारला समज दिली आहे का ? .एस.टी.डेपो मधील स्वच्छता गृह (महिला- पुरुष )स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी कोणाची. एस.टी.वाहतूक नियंत्रक प्रवाशांना सूचना देतात त्यांच्या सूचना स्पष्ट ऐकू येतात का ?
   एस.टी.गाड्यांचे नामफलक तुटलेल्या अवस्थेत आहेत हे अधिकारी बंधुना माहित आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे समाधान कारक असतील तर जरूर दरवाढ करा .नसतील तर मंञ्यांपासून अधिकार्यापर्यत सर्वांच्या मोफत सेवा बंद करून तूट भरून काढण्यासाठी प्रयत्न केले तर प्रवाशांना दिलासा मिळेल. डेपो व्यवस्थापक, परिवहन मंञ्यांनी डेपोंची पाहणी करावी. डेपो मध्ये टायरचा तुटवडा, नादुरुस्त गाड्या आहेत. यांच्या कोण पाहणार. 


- महादेव गोळवसकर ,कल्याण पश्चिम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: