आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २६ सप्टेंबर, २०२१

वाशीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पावसाची गळती ; संबंधित बांधकाम खात्याकडून जाणिवपूर्वक कानाडोळा

वढाव वार्ताहर (प्रकाश माळी) : शासनाने कोरोना काळात आरोग्य यंत्रणेला दक्ष राहण्याचे आदेश दिले असल्याने महाराष्ट्रातील सर्व आरोग्य यंत्रणा तत्परतेने काम करीत आहे.मात्र पेण तालुक्यातील वाशी प्राथमिक आरोग्य केंद्राची दैनिय अवस्था झाली असून पावसाळा सुरू झाल्यापासून उपकेंद्रात पावसाची गळती होत असल्याने उपकेंद्रात येणाऱ्या रुग्णांना या गळत होणा-या पावसाचा सामना करावा लागत आहे.पेण तालुक्यातील वाशी प्राथमिक आरोग्य केंद्रात मागच्या एक वर्षापूर्वी इमारतीच्या सर्व भागातील पत्रे बदलण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून जवळपास ३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला त्यानुसार अलिबाग येथील ठेकेदाराला काम देण्यात आले मात्र सदर ठेकेदारांनी इमारतीच्या वरील पत्रे बदलून न घेता त्याच जुन्या पत्रांची डागडुजी करून बसविले पण पावसाळ्याच्या सुरवातीपासूनच चांगल्याप्रकारे काम न केल्यामुळे मागच्या सात आठ महिन्यांपासून उपकेंद्रात पावसाचे पाणी येत आहे.त्यामुळे उपकेंद्रात लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना यांचा त्रास होत आहे.याबात वाशी उपकेंद्राच्या अधिकारी यांनी वारंवार संबंधित बांधकाम विभागाकडे पत्र व्यवहार केले मात्र याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी नेहमीच कानाडोळा केल्याने या अधिका-यांसह ठेकेदाराचा फावला आहे.त्यामुळे अशा ठेकेदाराची तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

[[ वाशी आरोग्य केंद्राबाबत आम्ही सातत्याने बांधकाम तसेच गटविकास अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केले आहे मात्र याकडे संबंधित अधिकारी  कानाडोळा करीत असून येथे लसीकरणासाठी येणाऱ्या नागरीकांना आमच्या पद्धतीने त्यांची उपाययोजना करीत आहोत.मात्र संबंधित ठेकेदारांनी या इमारतीच्या बाबत चांगले काम केले नाहीत त्यामुळे आमच्या कडून त्यांना काम पूर्ण झाल्याचा दाखला देण्यात आला नाही.]]- डॉ.मनिषा म्हात्रे - वाशी आरोग्य अधिकारी 

[[ याबाबत आम्ही स्थानिकांच्या माध्यमातून अनेकदा आवाज उठविला मात्र याकडे कोणाचेही लक्ष नाही.तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम राहणे महत्त्वाचे आहे यामुळे आपण आवाज उठविला तर नक्कीच वाशीची आरोग्य यंत्रणा जागी होईल.]]- हेमंत पाटील - सामाजिक कार्यकर्ते

[[याबाबत तत्काळ आम्ही दुरूस्ती करुन घेणार आहोत मात्र याकरीता ठेकेदाराचे पैसे ठेवले आहेत ]]-तेलंगे - अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: