आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१

मैत्री व संकल्प संस्थेतर्फे सामाजिक कार्यकर्ता व मानवी हक्क प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

 मुंबई  ( प्रतिनिधी ) -मैत्री व संकल्प संस्था , सद्भावना संघ ,लेक लाडकी अभियान ,यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा अमृतमहोत्सव व राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता व मानवी हक्क प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले असून दिनांक 4 ऑक्टोंबर 2021  रोजी संध्याकाळी ५.३०  वाजता मुंबई मराठी पत्रकार संघ पत्रकार भवन आझाद मैदान जवळ सीएसटी मुंबई येथे कार्यशाळेचे उद्घाटन ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी मा. डॉ.जी. जी पारीख यांच्या हस्ते होणार असून कामगार नेते व मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, समाजसेवक वासुदेव पाटील सद्भावना संघाच्या वर्षा विद्या विलास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते उद्योजक अनंत पाटील सामाजिक कार्यकर्त्या डॉ. मोनिका जगताप डॉ. चेतना दीक्षित ,तेजल  नाईक ,नसरीन शेख , रेखा हिरा, विशाल हिवाळे ,,गुणवंत कामगार प्रभाकर कांबळे , सामाजिक कार्यकर्ता प्रज्योत मोरे आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे मैत्री चे अध्यक्ष सुरज भोईर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. 

       सामाजिक कार्यकर्ता व मानवी हक्क प्रमाणपत्र प्रशिक्षण कार्यशाळेचे 10 वे वर्ष असून प्रत्येक रविवारी पूर्ण दिवसाचे प्रशिक्षण विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मार्गदर्शनाखालील घेण्यात येणार आहे .दोन महिन्याची  प्रमाणपत्र कार्यशाळा असून अठरा वर्षाच्या वरील कार्यकर्त्याने यामध्ये सहभागी व्हायचे आहेत .या सामाजिक कार्यकर्ता व मानवी हक्क प्रमाणपत्र कार्यशाळेत भारताचे संविधान .व्यक्तिमत्व विकास ,माहितीचा अधिकार न्यायव्यवस्था मानवी हक्क पोलिस यंत्रणा, नगर राज बिल ,जनसंपर्क प्रसारमाध्यम फुले आंबेडकर विचारधारा गांधीविचारांची कार्यशाळा पर्यावरण रक्षण युवक कामगार रेशन चळवळ स्त्री पुरुष समानता गुन्हेगारी अंधश्रद्धा निर्मूलन ज्येष्ठ नागरिक अंध अपंगाचे प्रश्न झोपडपट्टी प्रश्न ग्रामोद्योग स्वयंरोजगार बालकामगार निर्मूलन  एड्स मुक्ती व गीत पथनाट्य अशा विविध विषयावर मान्यवरांचे मार्गदर्शन व संस्था भेटी कार्यक्रम  होणार असून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य आत्मनिर्भर फाउंडेशन व मुंबई सर्वोदय मंडळ यांचे विशेष सहकार्य लागणार आहे .         

     तरी ज्यांना सामाजिक कार्याची आवड आहे अशा व्यक्तींनी कार्यशाळेचे संयोजक सुरज भोइर (9969686014) व प्राची कदम 8097159102 यांच्याशी संपर्क साधून आपली  नांव  नोंदणी करावी असे आवाहन  सामाजिक कार्यकर्ता समन्वय समितीचे संघटक रवी सावंत यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: