आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, २ ऑक्टोबर, २०२१

खड्डेमुक्त रस्त्यांसाठी नागरिकांनी हाती दगडं घ्यावीत ! सत्ताधाऱ्यांना झोपेतून जागे करण्याची वेळ आली आहे; नवीन पनवेल येथे रिक्षा नाका उदघाटन प्रसंगी कडू यांचे प्रतिपादन

नवीन पनवेल: रिक्षा मीटरप्रमाणे धावल्या पाहिजेत ही नागरिकांची कायदेशिर भावना आहे. तिचा आदर केला पाहिजे. परंतु वाहतूक कोंडी आणि खड्डेयुक्त रस्त्यांमुळे ते शक्य होत नसल्याने आता त्रासमुक्त, खड्डेमुक्त जगण्यासाठी नागरिकांनीच महापालिकेवर दगडं भिरकावल्याशिवाय सत्ताधारी, विरोधी गटाला त्यांच्या कर्तव्याची जाणीव होणार नाही, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी केले.

   नवीन पनवेल डीएव्ही स्कूलच्या समोरील रिक्षा चालकांनी संघर्ष रिक्षा संघटनेत प्रवेश केला. त्यांच्या नामफलकाच्या अनावरण प्रसंगी कडू यांनी सामान्य जनतेच्या तीव्र भावना आपल्या स्पष्ट आणि प्रांजळ मतांतून व्यक्त केल्या.

    रिक्षा चालक कोणत्याही संघटनेचा असो, त्याला भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. रिक्षा चालक हे स्थानिक आहेत, ते आजूबाजूच्या परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडून कोणतीही अप्रिय घटना घडणार नाही, आतापर्यंत घडली नाही. मात्र बाहेरच्या ओला-कुबेरबाबत नको ते ऐकायला मिळत असल्याने थोडे जास्त पैसे मोजावे लागले तरी प्रवाशांनी आपल्या स्थानिक रिक्षांतून सुरक्षित प्रवास करावा असे आवाहन कडू यांनी केले.

     सर्वच शहरांतील रस्ते आणि वाहतूक कोंडी तसेच नागरी सुविधांचा बोजवारा उडाल्याचे चित्र महापालिकेला भूषणावह निश्चितच नाही. पण तरीही सर्वच लोकसेवक मूग गिळून गप्प आहेत. नागरिकही शांत आहेत. त्यांनी त्रास सोसण्यापेक्षा एकदा हातात दगडं घेण्याचा अभिनव प्रयोग केल्यास फार मोठ्या परिवर्तनाची नांदी ठरेल, असे मत मांडून संघर्ष संघटनेचा नाका नागरिक आणि रिक्षा चालक यातील दुवा ठरेल असे. कडू म्हणाले.

यावेळी संघर्ष समितीचे पनवेल शहर अध्यक्ष गणेश वाघिलकर यांच्या हस्ते नाक्याचे पूजन करण्यात आले. नवीन पनवेल शहराध्यक्ष भूषण साळुंके यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आला. नामफलकाचे अनावर करण्यात आले. शेकाप नेते प्रभाकर कांबळे, महाराष्ट्र पंचायतन रिक्षा संघटनेचे नेते संतोष आमले, युवा नेते सचिन पाटील व हरेश पाटील, संजय यादव, बंडू देशमुख, माऊली, बुवा पाटील आदी जण उपस्थित होते.

हजारो आले आणि गेले, काही आरटीओचे दलाल झाले: संतोष आमले

     आतापर्यंत विविध रिक्षा संघटनांच्या माध्यमातून हजारो नेते पुढे आले आणि अस्ताला गेले. काही त्यातील आरटीओचे दलाल झाले. परंतु कांतीलाल कडू हे रिक्षा चालक, मालकांसाठी निःस्वार्थीपणे काम करीत असल्याचा दावा महाराष्ट्र रिक्षा पंचायतनचे नेते संतोष आमले यांनी केला.ते म्हणाले प्रत्येक समस्येवर उपाय असलेला एकमेव माणूस म्हणून सध्या कडू यांच्याकडून सामन्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत आणि त्या पूर्ण करण्याचे कसोशीने काम कडू करीत असल्याचे आमले यांनी सांगितले.

जात, पक्ष, धर्मापलीकडे जावून मदत करणारे नेतृत्व: प्रभाकर कांबळे

   कांतीलाल कडू यांच्या कामाचा प्रत्ययकारी अनुभव अनेकांना आहे. आपणही कोरोना काळात त्यांना सांगितलेले वैद्यकीय मदत त्यांनी तात्काळ मिळवून दिली. कोरोना काळातील त्यांच्या कामगिरीला तोड नाही. ते कधीही जात-पात, राजकीय पक्ष अथवा धर्म न पाहता माणुसकीच्या नात्यातून सर्वांना मदतीचा हात देतात, असे गौरवदगार शेकाप नेते प्रभाकर कांबळे यांनी काढले.नवीन पनवेलमध्ये कडू यांच्या रिक्षा चालकांना सदैव मदतीचा आपला हात पुढे असेल असे आश्वासन त्यांनी आपल्या मनोगतातून दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गोरेगाव येथे श्री स्वामी पुण्यतिथी उत्साहात संपन्न!

मुंबई : गोरेगाव (पूर्व) येथील, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) व नागरी निवारा परिषद गणेश...