आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २६ सप्टेंबर, २०२१

भारत बंदला १९ प्रमुख राजकीय पक्षांसहित सामाजिक ,विद्यार्थी -युवक संघटनांचा पाठिंबा

मुंबई - संयुक्त किसान मोर्चानी २७ सप्टेंबर रोजी घोषित केलेल्या भारत बंदला देशातील प्रमुख १९ पक्षांनी,कामगार संघटना कृति समिती,किसान संघटना,विद्यार्थी,युवक संघटनांनी पाठींबा दर्शविला आहे.मुंबईमध्ये २७ तारखेला अंधेरी स्टेशन( पश्चिम) सकाळी ११ वाजता, राणी लक्ष्मीबाई चौक,सायन सकाळी ११:३० वाजता,रत्ना हॉटेल गोरेगाव( पश्चिम) सकाळी ११ वाजता प्रखर निदर्शने करून केन्द्र सरकारचा निषेध केला जाईल.

ह्या निदर्शनात,कॉग्रेस,राष्ट्रवादी,भारतीय कम्युनिस्ट पक्ष,मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,समाजवादी पार्टी,आप,लाल निशान ( लेनिनवादी) ,एसयुसीआय,भाकप माले,जनता दल (सेक्युलर),श्रमिक मुक्तिदल,एनएपीएम,हम भारत के लोग,सेव्ह डेमॉक्रॅसि,सेन्ट्रल विस्टा विरोधी भारत,विविध कामगार ,युवक,विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते सामील होतील.बीजेपीच्या केन्द्र सरकारने केलेले कॉर्पोरेट धार्जिणे तीन कृषी कायदे रद्द करावेत,एमएसपीचा कायदा करावा,२०२० चा वीज कायदा रद्द करावा,केन्द्राने केलेले कामगार विरोधी कायदे रद्द करावेत,डिझेल पेट्रोल,घरगुती गॅस दरवाढ मागे घ्यावी,महागाईला आळा घालावा,नवी शिक्षण निती हाणून पाडा इत्यादी बंदच्या मागण्या आहेत.या आंदोलनात सामील होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: