आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २६ सप्टेंबर, २०२१

राष्ट्र उभारणीसाठी अंगणवाड्या मोलाचे योगदान देत असून राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केले आहाराची उत्तम जनजागृती - हेमा काटकर ( बाल विकास प्रकल्प अधिकारी , विक्रोळी कांजूरमार्ग प्रकल्प)

मुंबई(शांत्ताराम गुडेकर )- देशातील पुढील पिढी घडविण्यात अंगणवाडी ही संस्था मोलाचे योगदान देत असून बालकांचे आरोग्य व शिक्षणासाठी केलेली ही गुंतवणूक आहे त्याचबरोबर बालकाच्या शारीरिक व मानसिक विकासाचा पाया मजबूत करण्याचे काम अंगणवाडीतून  विविध उपक्रमाद्वारे करण्यात येत असून राष्ट्रउभारणीसाठी अंगणवाड्या महत्त्वाचे काम करत असल्याचे तसेच राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केलेल्या सकस आहाराची उत्तम जनजागृती उल्लेखनीय असल्याचे बाल विकास प्रकल्प अधिकारी हेमा काटकर यानी राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत पोषण मास मंगळागौर कार्यक्रमाच्या आयोजन प्रसंगी उद्घाटनपर भाषणात सांगितले .

            विक्रोळी टागोर नगर येथे महिला व बाल विकास विभागाअंतर्गत विक्रोळी कांजूरमार्ग एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाच्या वतीने बाल विकास प्रकल्प अधिकारी हेमा काटकर मुख्य सेविका नंदिका काळभोर व सोनाली देशमुख व सेक्टर च्या प्रकल्पातील 40 अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या विशेष परिश्रमाने बालकांची पोषण व आहारा विषयक दर्जात सुधारणा करण्यासाठी तसेच कुपोषित मुक्त करण्यासाठी राष्ट्रीय सकस आहार पोषण अभियान अंतर्गत म्हणजेच पोषण मास निमित्ताने  सकस आहार व पोषणावर प्रतिज्ञा, समूहगीत, पोस्टर द्वारे  तसेच नृत्याच्या तालावर व हिरव्या पालेभाज्या फळ भाज्या कडधान्य फळे घरगुती वापरण्यात येणाऱ्या सुपाला  सुद्धा आहाराचे  पोस्टर लावण्यात आले होते तसेच मातीच्या व स्टीलच्या मटक्यावर कडधान्य लावून पोषण मटका घेऊन मंगळागौर कार्यक्रमाद्वारे आहाराची जनजागृती करण्यात आल्याचे मुख्य सेविका सौ नंदिता ताई काळभोर यांनी बोलताना सांगितले.

             बाल विकास प्रकल्प अधिकारी हेमा काटकर  यांनी राष्ट्रीय पोषण मास कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी बोलताना सांगितले.की, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी सादर केलेल्या वेगवेगळ्या माध्यमातून राष्ट्रीय पोषण सकस आहाराची जनजागृती उल्लेखनीय असून जो घेईल सकस आहार, दूर पळतील सारे आजार, सही पोषण, देश रोशन, चांगले आरोग्य, हीच खरी संपत्ती, अशा अनेक प्रकारच्या घोष  वाक्यांच्या माध्यमाद्वारे जनजागृती चांगल्या प्रकारे केली असल्याचे सांगितले.राष्ट्रीय पोषण मास कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका सुषमा वाघमारे यांनी केले असून दिपप्रज्वलन बाल विकास प्रकल्प अधिकारी हेमा  काटकर ,मुख्य सेविका नंदिका काळभोर व सोनाली देशमुख तसेच शिवसेनेच्या कार्यकर्त्या सावित्री कनोजिया यांच्या हस्ते  उद्घाटन करण्यात आले. व थोर समाज सेवक यांच्या प्रतिमेला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले  असून मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

           राष्ट्रीय पोषण मास मंगळागौर कार्यक्रमासाठी सेक्टर अ च्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी विशेष सहभाग घेऊन  प्रत्येक घर  पोषण उत्सव, बनविण्यासाठी अभिसरण कृती कार्यक्रम निबंध स्पर्धा आरोग्य तपासणी गरोदर व स्तनदा माता यांना ग्रह भेट देऊन पोषणाचे महत्त्व सांगितले. बालकांची वजन उंची घेऊन पालकांना आहाराविषयक माहिती दिली. आरोग्याची काळजी घेण्यासाठी आहारासंबंधी जनजागृती केली जाते  हर घर पोषण ,कुपोषित से रहो दूर., अशा अनेक प्रकारच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत पोषणाच्या निमित्त आहाराची जनजागृती करण्यात आली असून शेवटी सर्वांचे आभार अंगणवाडी सेविका विद्या मोहिते यांनी मांडले असून सर्वांनीअल्पोपहाराचा आस्वाद घेऊन राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गोरेगाव येथे श्री स्वामी पुण्यतिथी उत्साहात संपन्न!

मुंबई : गोरेगाव (पूर्व) येथील, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) व नागरी निवारा परिषद गणेश...