आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१

आरे कॉलनीतील बिरसामुंडा चौक येथील पोलिस बीट चौकी व परिसर लवकरच सुशोभित : जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार. माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या निधीतून सुशोभिकरण

आ. वा वृत्तसेवा. मुंबई - जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणार्‍या पोलिस स्थानकांना उत्तम सुविधा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या आमदार निधीतून आरे कॉलनीतील पिकनिक पॉईंट येथील बिरसामुंडा चौकाजवळ असणार्‍या बिट चौकी व सभोवतालील परिसर सुशोभित करण्यात येणार आहे.जनतेच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणार्‍या पोलिसांना आरे कॉलनीतील रहिवाशांसाठी पिकनीक पॉईंट येथे बिट चौक बांधण्यात आली आहे.या चौकीलगतच शौचालय बांधून देण्याची मागणी आरे पोलिसांकडून करण्यात आली होती.या शौचालयाच्या भुमीपुजनासाठी आमदार रविंद्र वायकर सोमवारी तेथे गेले असता, नव्याने बांधण्यात आलेल्या या चौकीच्या अंतर्गत भागातील गळती बघून या चौकीच्या संपुर्ण भागात शौचालयाबरोबरच चांगली शेड, चांगल्याप्रतीच्या लाद्या व प्रवेशद्वार बांधून देण्याच्या आश्‍वासन यावेळी दिले. 

   आरे पोलिस ठाण्याला लागून असलेल्या ५ एकर जागेत आरे पोलिस ठाणे नव्याने बांधण्यासाठी आमदार रविंद्र वायकर यांनी शासनाकडे पाठपुरावा करून आवश्यक त्या सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण केल्या असून जागेची मोजणी झाल्यानंतर ही जागा गृहविभागाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. लवकरच या जागेवर आरे पोलिस ठाण्याची नवी इमारत उभारण्यात येणार आहे.महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.उद्धवजी ठाकरे, मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री, पर्यटन, पर्यावरण मंत्री मा.ना.श्री. आदित्यजी ठाकरे तसेच पशु व दुग्ध विकास मंत्री मा.ना.श्री. सुनील केदारे यांच्या समवेत याप्रश्नी वायकर यांनी बैठकाही घेतल्या.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे  यांच्या समवेत पार पडलेल्या बैठकीनंतर आरेतील ५ एकर जागा गृहखात्याच्या ताब्यात देण्याचे आदेश पशु व दुग्ध विभागाला देण्यात आले.

  एवढेच नव्हे तर आरे कॉलनीतील नागरमोडी पाडा येथील पायवाटा व शौचालय, श्री स्वामी समर्थ मठ सेवा मंडळ, युनिट क्र. ६ येथे लादीकरण कामांचे भूमीपुजन यावेळी करण्यात आले. यावेळी नगरसेविका रेखा रामवंशी, आरे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षिका ज्योती देसाई, महिला विभाग संघटक शालिनी सावंत, उपविभागप्रमुख जितेंद्र वळवी, उपविभाग संघटक मयुरी रेवाळे, शाखाप्रमुख संदिप गाढवे, बाळा तावडे, महिला शाखा संघटक हर्षदा गावडे, सुरेखा गुटे, पुजा शिंदे तसेच शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: