आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१

सौ.सुरेखा गावंडे या स्वयंसिद्धा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

आ. वा वृत्तसेवा. मुंबई -अखिल भारतीय पत्रकार संघातर्फे शनिवार दि.२५ सप्टेंबर  रोजी नाशिकच्या परशुराम सायखेडकर नाट्यगृहात कर्तृत्ववान महिलांच्या सन्मानार्थ स्वयंसिद्धा राष्ट्रीय पुरस्कार समारंभ मोठ्या दिमाखात अतिशय नियोजनबद्ध व शिस्तबद्ध  पद्धतीने आणि करोनाचे सर्व नियम पाळून शांतपणे पार पडला.संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांना हा पुरस्कार देण्यात आला.

   कल्याण पूर्व मधून कवयित्री,लेखिका सौ. सुरेखा अशोक गावंडे यांना अ.भा.पत्रकार संघाचे अध्यक्ष महेन्द्र देशपांडे,अभिनेता चिन्मय उदगिरकर आणि मिसेस ग्लोबल युनिव्हर्स २०२१ संगीत खैरनार यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. अत्यंत मानाचा हा पुरस्कार मिळालेल्या सर्व पुरस्कार्थी महिलांना मानाचा फेटा बांधण्यात आला होता.यावेळी देशपांडे सर,चिन्मय उदगिरकर आणि संगीत खैरनार या मान्यवरांनी आपले मनोगत मांडताना मोलाचे मार्गदर्शन केले.

   सुरेखा गावंडे यांची पाच पुस्तके प्रकाशित आहे.इयत्ता आठवीच्या सुगमभारती या पाठ्यपुस्तकात त्यांची *कोळ्याची पोर* ही कविता सामाविष्ट आहे. मराठी गाण्याचा अल्बम तसेच मराठी चित्रपट गीत लेखनही त्यांनी केले आहे.नवीन काव्यसंग्रह तसेच कथा,पटकथा,संवाद, शिर्षक गीत लिहीलेला *ऑक्सिजन *हा त्यांचा लघुचित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: