आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१

समता साहित्य अकादमी आयोजित "आदर्श शिक्षक" पुरस्कार समारंभ संपन्न

प्रतिनिधी :  समता साहित्य अकादमी, यवतमाळ, महाराष्ट्र तर्फे शिक्षक दिनाचे औचित्य साधून सन २०२०-२१ या वर्षातील "आदर्श शिक्षक पुरस्कार " समारंभ नुकताच नागपूर येथील हॉटेल हरदेव सभागृहात दिनांक २४ सप्टेंबर २०२१ रोजी पार पडला. या समारंभात ४ आंतरराष्ट्रीय व ३६ राष्ट्रीय पातळीवरील शिक्षक आणि सामाजिक क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना "समता पुरस्काराने" सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री मा. श्रीयुत नितीन राऊत, खासदार श्रीयुत रामदास तडस, राज्यसभा खासदार व पद्मश्री पुरस्कारप्राप्त श्रीयुत विकास महात्मे, महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवकसेवा आयुक्तालयाचे सहसंचालक श्रीयुत जयप्रकाश दुबळे साहेब आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.

        देशातील २४ राज्यातील मर्यादित मंडळी या कार्यक्रमात उपस्थित होती. महाराष्ट्र राज्यातील सहाजणांना संपुर्ण सेवकाळात त्यांनी बजावलेल्या उत्कृष्ठ सेवकार्यामुळे राष्ट्रीय समता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई मालाड येथील उपमुख्याध्यापिका सौ. सुषमा राऊळ, कुळगाव बदलापूर(पूर्व) नगरपालिका शाळांच्या कोऑरडींनेटर आणि मुख्याध्यापिका सौ. भावना घोलप यांना "आदर्श शिक्षिका समता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच जे एन पी टी उरण येथील क्रिडा शिक्षक श्रीयुत मनोहर टेमकर सर यांना "आदर्श क्रीडारत्न" समता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

       विविध कार्यक्षेत्रात अनन्यसाध:रण कार्य करणाऱ्या राज्यातील, देशभरातील आणि देशाबाहेरील विविध मंडळींचा सन्मान समता साहित्य आकादमीतर्फे करण्यात येतो. यावर्षी विशेषतः बदलापूर, मुंबई आणि उरण येथील गुणवंत तीन शिक्षकांना समता पुरस्काराने सन्मानित केले असल्याने सगळीकडे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: