आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २६ सप्टेंबर, २०२१

वाशी - सरेभाग रस्त्याच्या खांडीला तडा, युद्ध पातळीवर उपाययोजना न केल्यास ग्रामस्थ करणार उपोषण, शेकडो एकर जमीन नापीक होण्याच्या मार्गावर

वढाव  (प्रकाश माळी) - :पेण खारेपाट भागाला मुलभूत सुविधा पासुन वंचित राहणे हे ग्रामस्थांच्या पाचवीला पुजली आहे. कोणत्यान कोणत्या तरी मूलभूत सुविधांचा भावामुळे चर्चेत येतो. 

  पेण तालुक्यातील वाशी सरेभाग येथील कार्यरत असलेली खाडीच्या बाजुने रस्त्यावर  दोन दिवसापूर्वी मोठ मोठ्या तडा जाऊन खालच्या बाजूने रस्ता खचण्यस सुरुवात झाली आहे. जर काही या नविन तयार करण्यात आलेल्या खाडी लगत च्या रस्त्याला खांड गेली तर येणाऱ्या काही दिवसांत शेकडो एकर जमीन पाण्याखाली जावुन जमीन नापीक होण्याच्या मार्गावर आहे. 

   रस्त्यालगत आज पर्यंत शेतकऱ्यांनी हजारो एकर पिकवलेली शेती कापणी करता आलेले असताना या शेतीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. वडलोपार्जित असणारी जमीन ही शेतकऱ्यांच्या पोटापाण्याचा असरा आहे तो या होणाऱ्या मोठ्या दुर्घटनेमुळे  शेतकऱ्याच्या नशीबात आलेले पिक वाया जाण्याची शक्यता आहे हजारो कुटुंबे या दुर्घटनेमुळे उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे 

समुद्राचं खारं पाणी या भागातून वाशी, बोरी, शिर्की, वडखल पर्यंत जाऊन तेथील जमीन नापीक होऊ शकते व घरे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.  मागील काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी अशीच प्रकारचे दुर्घटना घडली होती. त्यावेळी जि प सदस्य हरी ओम म्हात्रे यांनी स्वखर्चाने खचलेल्या बंदिस्ती चे काम केले होते. परंतु त्यावेळी उन्हाळी हंगाम असल्यामुळे व मालवाहतूकीस शेतातून दुसरा मार्ग उपलब्ध असल्यामुळे त्या वेळच्या परिस्थितीवर नियंत्रण करणे सोपे झाले. परंतु आता वाहतुकीकरिता मार्ग उपलब्ध नाही व त्यामुळे  खचलेल्या रस्त्यावर वेळीच नियंत्रण झाले नाही तर मोठी दुर्घटना होऊ शकते तसेच खचण्यास सुरुवात झालेल्या रस्त्याला तातडीने उपाययोजना करून आटोक्यात आणले नाही तर येथील खारेपाट भागातील बहुतेक गावाचे व वाड्यांचे भयंकर मोठ्या प्रमाणात नुकसान   होऊ शकते. तसेच येथील शेतकरी बांधवांनी एक मातीनं ठरवले आहे की जर आमच्या वाशी सरेभाग रस्तावरील खचलेल्या रस्त्यांची बंदिस्ती चे  तातडीने उपाययोजना करून दुरुस्त झाले नाही तर आम्ही वाशी  विभाग मध्ये सर्व ग्रामस्थ उपोषणाला बसणार आहेत असे पत्र उपअधिकारी पेण यांना दिले आहे. 

[[ सदर रस्त्यांच काम चालु आहे या बाजुला खाडी आहे या खाडीच्या पाण्याचा प्रवाहाला दोन्ही बाजुला गर्गे (दगडी भिंत) नसल्याने रस्ता जागोजागी खचत चालला आहे. गर्गे टाकण्याचे काम युद्धपातळीवर केले तर सरेभाग येथील कित्येक वर्ष रखडलेल्या रस्त्यांचे ग्रामस्थांचे स्वप्न साकार होतील ]] -गोरख पाटील -संरपच वाशी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: