आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २४ मे, २०२१

पेण तालुक्यातील आंबिवली येथे लसीकरण केंद्राचे उद्घाटन


पेण ( विनायक पाटील ):- पेण तालुक्‍यातील आंबिवली येथे आज लसीकरण केंद्राचे उद्घाटन आंबिवली सरपंच नेहा प्रशांत पाटील व माजी सरपंच देविदास नारायण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.पहिल्याच दिवशी 55 लोकांना लसीकरणाचा डोज देण्यात आला.आंबिवली गावामध्ये लसीकरण केंद्र सुरू झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे कारण या अगोदर आंबिवली गावातील नागरिकांना जिते नाहीतर पेण उपजिल्हा रुग्णालयात लस घेण्यासाठी जावे लागत होते त्यामुळे नागरिकांना त्रास होत होता.
   आंबिवली येथे लसीकरण केंद्र सुरू झाल्याने नागरिकांनी सरपंच नेहा पाटील यांचे आभार मानून अभिनंदन केले या कार्यक्रम प्रसंगी सरपंच नेहा पाटील,माजी सरपंच देवीदास पाटील,प्रशांत पाटील यांच्यासह डॉ.प्रियंका जगदाले,आरोग्य सेविका एन.आर.पाटील आरोग्य सेवक डी. एन.घरत,आशा सेविका अश्विनी नाईक,विशाखा पाटील,शिल्पा पाटील व मदतनीस रेवती पाटील आदींसह उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फिलिप रॉड्रिग्ज यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

मुंबई (गणेश हिरवे) शिक्षक नेते शिवाजी शेंडगे आयोजित नुकताच शिक्षक स्नेहमिलन कार्यक्रम दहिसर येथील पूजा हॉल मध्ये संपन झाला.यावेळ...