आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २४ मे, २०२१

हमरापूर विभागात उभरते युवा नेतृत्व संतोष म्हात्रे

पेण(प्रतिनिधी) :- पेण तालुक्यातील दादर जिल्हा परिषद गट काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. माजी कॅबिनेट मंत्री रविशेठ पाटील काँग्रेसमध्ये असताना या गटातून त्यांचे पुत्र वैकुंठ पाटील तसेच कौसल्या रविंद्र पाटील या निवडणुकीत निवडून आल्या होत्या. त्यानंतर शे.का.प.चे दिवंगत नेते प्रमोद (पिंट्याशेठ) पाटील हे निवडून आले होते. त्यानंतर ते तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले होते. परंतु त्यांच्यावर काळाने झडप घातल्याने हा विभाग तरुण नेतृत्वाला मूकल्याचे भावना व्यक्त होत असतानाच संतोष म्हात्रे यांच्या रूपाने तरुण तडफदार नेतृत्व उदयाला येत आहे.
      पेण पंचायत समितीचे माजी सभापती सदानंद म्हात्रे यांचे पुतणे, माजी सरपंच के.डी.म्हात्रे यांचे नातू व माजी सरपंच चंद्रकांत तुकाराम पाटील यांचे ते जावई असल्याने त्यांच्याकडे राजकीय वारसा आहे. त्यामुळे वैकुंठ पाटील व पिंट्याशेठ पाटील  हे पहिल्या वेळी 2007 ला आमनेसामने असताना  संतोष म्हात्रे यांनी वैकुंठ पाटील यांना साथ दिल्याने दादर गटात निर्णायक आघाडी मिळाल्याने वैकुंठ पाटील विजयी झाले होते. त्यानंतर 2017 च्या निवडणुकीत संतोष म्हात्रे यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करून पिंट्याशेठ यांना दादर गटात आघाडी दिल्याने पिंट्याशेठ विजयी झाले होते.         
      राजकीय व सामाजिक कार्याच्या  जोरावर ते आपली कारकीर्द चांगली करून तरुणांच्या मनावर राज्य करत असताना बंडखोरीमुळे त्यांना थेट सरपंच निवडणूकित त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यातून सावरत त्यांनी आपले सामाजिक कार्य सुरूच ठेवले.  सामाजिक, क्रीडा, कला व इतर क्षेत्रात त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत तरुणांना संघटित केले. त्यामुळे हमरापूर विभागात तरुणांना आशेचा एकच तारा संतोष म्हात्रे यांच्या रूपाने दिसत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नवभारत हायस्कूल कुसूर* येथे मोफत ई लर्निग किट, लॅपटॉप आणि प्रिंटर वाटप कार्यक्रम संपन्न ; साई एज्युकेअर फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम...!

वैभववाडी - कुसूर गावातील माध्यमिक शाळा, नवभारत हायस्कूल येथील विद्यार्थ्यांसाठी साई एज्युकेअर फाउंडेशन (रजि.) या संस्थेतर्फे (CSR Initiative...