आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २४ मे, २०२१

शिवसेनेकडून पेण उपजिल्हा रुग्णालयासाठी ऑक्सिजन काँन्सेन्टेटर मशीन भेट

पेण(विनायक पाटील) :- "कोरोनाच्या महामारीने राज्यासह जिल्ह्यात मोठे संकट आले आहे. रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार महेंद्र दळवी यांच्याकडून पेण उपजिल्हा रुग्णालयासाठी ऑक्सिजन काँन्सेन्टेटर भेट देऊन रुग्णांच्या हिताचे काम केले आहे.हे त्यांचे काम कौतुकास्पद असून याचा लाभ पेणच्या जनतेला निश्चितच होईल.या एका ऑक्सिजन काँन्सेन्टेटर मशीनमध्ये 5 रुग्णांना लाभ मिळणार आहे. त्यामुळे पेणकरांना चांगली सुविधा मिळाली आहे." असे वक्तव्य शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा प. स. सदस्य नरेश गावंड यांनी केले.
     शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार महेंद्र दळवी व शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा प. स. सदस्य नरेश गावंड तसेच शिवसेना पेण यांच्याकडून पेण उपजिल्हा रुग्णालयासाठी ऑक्सिजन काँन्सेन्टेटर मशीन देण्यात आल्याने डॉ.सुरज म्हात्रे यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी नरेश गावंड, पेण तहसीलदार अरुणा जाधव, डॉ. सूरज म्हात्रे, शुभांगी म्हात्रे, रमेश गिरके, सुधाकर म्हात्रे, बी. एच. पाटील, लवेंद्र मोकल, राजू पाटील, चेतन मोकल, राजेश पाटील, प्रसाद देशमुख, दिलीप पाटील, श्रीतेज कदम, तुकाराम म्हात्रे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गोरेगाव येथे श्री स्वामी पुण्यतिथी उत्साहात संपन्न!

मुंबई : गोरेगाव (पूर्व) येथील, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) व नागरी निवारा परिषद गणेश...