प्रतिनिधी / उदय वाघवणकर : दिनांक - २४ मार्च रोजी जोगेश्वरी ( पुर्व) येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मनपा ट्रॉमा केअर रुग्णालयात भारतीय कामगार सेना अध्यक्ष / खासदार / शिवसेना नेते अरविंद सावंत आणि भारतीय कामगार सेना चिटणीस / संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहचिटणीस / संजीव राऊत, सुजित कारेकर, दशरथ (बाबू) केरकर, संतोष सावंत व शिवसेना शाखा क्र.७२ चे शाखाप्रमुख अमरनाथ मालवणकर, विलेपार्ले ८३ - ८५ चे उपविभाग अधिकारी समीर राणे आणि युनिट लिडर राजेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सदर रुग्णालयातील बहूद्देशीय कामगार (एम.पी.एल) यांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद आंदोलन केले.सोमवार दिनांक - २२ मार्च रोजी यासंदर्भात इशारा देण्याकरिता काम बंद करण्यात आले होते तेव्हा मंगळवार दिनांक - २३ मार्च रोजी पगार देणार असल्याचे सिगमा या कंपनीकडून सांगण्यात आले परंतु मंगळवारी पगार न दिल्याने बुधवार दिनांक - २४ मार्च रोजी सकाळी ठीक ०८:३० वाजल्यापासुन ते दुपारी २ वाजेपर्यंत या कामगारांनी काम बंद केले होते.त्यानंतर सिगमा या कंपनीचे मॅनेजर यांनी येऊन युनियन आणि रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी / डॉ. राजेंद्र बच्छाव यांच्या समोर सांगितले की, तांत्रिक अडचणीमुळे आणि सिगमा या कंपनीचे मालक काही समस्येमध्ये मध्ये फसल्यामुळे पगार उशिरा होईल व त्यांनी म्हणजे सिगमा कंपनीच्या मेनेजर यांनी याबाबत व कामगारांच्या कोविड भत्ते, पगार आणि पीएफ संदर्भात लेखी स्वरूपात आश्वासन दिले आहे.यावेळी भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत कामगारांच्या पाठीशी सदैव उभे राहु व त्यांच्या या मागण्या पुर्ण केल्याशिवाय राहणार नाही.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
ईबीडी बुद्धिबळ स्पर्धेत धनश्री बुद्धिबळ अकादमीच्या स्मित, शुभम आणि विवानचे निर्भेळ यश
मुंबई: (प्रेम पंडित )- धोरणात्मक कौशल्य आणि तरुण बुद्धिमत्तेचे उत्कृष्ट प्रदर्शन करत ईबीडी बुद्धिबळ स्पर्धा (EBD Chess Tournamen...
-
प्रतिनिधी : पेण तालुक्यातील वाशी-शिर्की खारेपाट परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला असून सामाजिक कार्यकर्ते अमर बळीराम म्ह...
-
दापोली : (विशाल मोरे ) तालुक्यातील ग्रामपंचायत दमामे- तामोंड या गावातील सुतारवाडी, बुद्धवाडी गुरववाडी, मधलीवाडी, वडाचीवाडी, हनुमान वाडी येथ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा