आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २४ मार्च, २०२१

कुष्ठसेवक, समाजसेवक श्री अविनाश म्हात्रे याना प्रेरणा उत्कृष्ट समाजसेवक २०२१ पुरस्कार

अंबरनाथ -प्रेरणा फौंडेशन बदलापूरच्या संस्थेतर्फे अनेक चांगले स्तुत्य सामाजिक उपक्रम नेहमी राबविले जाते त्यात मुख्यतः सामाजिक जनसेवा,शैक्षणिक उपक्रम,कलाक्षेत्र,स्वश्चता अभियान व इतर अनेक चांगले महत्वाचे सामाजिक उपक्रम राबविले जाते, कोरोना सारख्या महामारीत दीप्ती उर्फ प्रेरणा गावकर याचे कार्य अतिशय उल्लेखनीय होते. कोरोनाची चिंता न करता स्वतः रस्त्यावर उतरल्या होते व मदतीचा हात पुढे केला होता ,वंचित / गरिबांबद्दल त्याची निस्वार्थ भावना तळमळ अतिशय नोंद घेण्यासारखी आहे. प्रेरणा फौंडेशन बदलापूरच्या संस्थापिका / अध्यक्ष दीप्ती उर्फ प्रेरणा गावकर यांच्या संस्थेचा तृतीय वर्धापन दिन दिनांक २३ मार्च २०२१ रोजी दुपारी ३ ते ५ वाजता एन.जी. विद्यालय, बॅरेज रोड,समर्थ नगर,बदलापूर पश्चिम ४२१५०३ येथे साजरा करण्यात आला होता 

 संस्थेचा तृतीय वर्धापन दिनाचे औचित्य साधून स्वतः मेहनत व स्वकष्ठाने घरचालवून कुटुंबाचा आधारस्तंभ बनणाऱ्या अनेक रिक्षा चालक महिलांना राज्यस्तरीय हिरकणी २०२१ पुरस्काराने सन्मानित करून त्यांची  मुलखात घेण्यात आली ,या कार्यक्रमासाठी सन्माननीय प्रमुख अतिथी कुष्ठसेवक/ समाजसेवक मा.श्री.अविनाश म्हात्रे ( सचिव कुष्ठरोगी दिन दलित सेवा संघ / कार्याध्यक्ष पत्रकार उत्कर्ष समिती) यांना प्रेरणा फौंडेशनचा राज्यस्थरीय उत्कृष्ट समाजसेवक २०२१ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  त्याच प्रमाणे समाजसेवक / समाजसेविका  मा.इंदुताई घाटगे, (संस्थापिका), मा. मनीषा घाटगे चौगुले,  (संचालिका), मा.श्री.मंगेश सावंत (समादेशक कमांडिंग ऑफिसर) मा.श्री बळीराम कथोड,(संस्थापक कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट, गीतक,र, कवी, कृषिमित्र,) मा.सौ.वैशाली चांदेकर (मुख्याधापिका कवयत्री),मा.कुमार शैलेश सणस ( उपसंपादक रोशनी न्युज चॅनेल ) यांचा प्रेरणा २०२१ पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

  हा पुरस्कार  वितरण मर्यादित लोकांमध्ये कोरोना महामारीचे सर्व अटी व नियम, सोशिअल डिस्टन्सचे नियम पाळून साजरा करण्यात आला होता , या कार्यक्रमासाठी सन्माननीय प्रमुख अतिथी मा.श्री.अविनाश म्हात्रे ( सचिव कुष्ठरोगी दिन दलित सेवा संघ / कार्याध्यक्ष पत्रकार उत्कर्ष समिती) मा.इंदुताई घाटगे, (संस्थापिका), मा. मनीषा घाटगे चौगुले,  (संचालिका), मा.श्री.मंगेश सावंत (समादेशक कमांडिंग ऑफिसर) मा.श्री बळीराम कथोड,(संस्थापक कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट, गीतकIर, कवी, कृषिमित्र,) मा.सौ.वैशाली चांदेकर (मुख्याधापिका कवयत्री),मा.कुमार शैलेश सणस ( उपसंपादक रोशनी न्युज चॅनेल ) हे उपस्थित होते,कार्यक्रम अतिशय छान झाले कार्यक्रमाचे अतिशय सुंदर सूत्र संचालन कुमारी दिव्या गावकर हिने केले,कार्यक्रमासाठी उत्तम प्रकारे मेहनत आणि संयोजन कार्याध्यक्ष श्री.वैभव कुलकर्णी, सचिव श्री. अनंता पवार, उपखजिनदार दिव्या गावकर व इतर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

ईबीडी बुद्धिबळ स्पर्धेत धनश्री बुद्धिबळ अकादमीच्या स्मित, शुभम आणि विवानचे निर्भेळ यश

मुंबई: (प्रेम पंडित )- धोरणात्मक कौशल्य आणि तरुण बुद्धिमत्तेचे उत्कृष्ट प्रदर्शन करत ईबीडी बुद्धिबळ स्पर्धा (EBD Chess Tournamen...