आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, २६ जानेवारी, २०२१

कांजूरमध्ये आजी माजी सैनिकांचा आमदार सुनील राऊत यांच्या हस्ते यथोचित सन्मान

मुंबई - भारतीय सैनिक स्वतःच्या जीवाची पर्वा ना करता आपलं संरक्षण करतात हि अभिमानास्पद गोष्ट असून आज देशाची परिस्थिती बिकट आहे. चीन, पाकिस्तान डोके वर काढतय. याही परिस्थिती मध्ये कौतुकास्पद कामगिरी करीत आहेत. म्हणून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताचे औचित्य साधून सैनिक हो, तुमच्यासाठी असा आजी माजी सैनिकांचा भव्य सत्कार आयोजन महापौर मैदान, कांजूरमार्ग येथे दि. २४ जानेवारी रोजी करण्यात आले होते. त्यावेळी आमदार सुनील राऊत यांनी सैनिकांच्या सत्कारादाखल मार्गदर्शन करताना प्रतिपादन केले.

   प्रारंभी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मांसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण केले व दीपप्रज्वलन आमदार राऊत आणि इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी आमदार सुनील राऊत म्हणाले कि या कार्यक्रमाचे आयोजक योगेश रमेश चव्हाण यांनी माझ्या मतदार संघात असा पहिला कार्यक्रम घेतला आहे. याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. कारण अशाप्रकारे विधायक कार्यक्रम राबविण्याचे कार्यकर्त्यांना नेहमीच सूचित करीत असतो. आपलं नेहमी यासाठी सहकार्य राहील असे विषद केले.

  चिपळूण गावचे रहिवाशी आयोजक योगेश चव्हाण यांनी सांगितले कि, बालविकास मंडळ, श्रद्धा विकास मंडळ आदी मंडळासोबतचे कार्यकर्ते आपल्या सोबत असल्याने काही तरी माझ्या सैनिकांसाठी करावे या हेतूने आमदार सुनील राऊत याना भेटलो. त्यांनी संकल्पना उचलून धरली आणि आजचा कार्यक्रम साजरा करता आल्याचे सांगितले.

  यावेळी नगरसेविका सुवर्ण कारंजे यांनी खरंच हा स्तुत्य असा उपक्रम राबविण्यात आल्याचे नमूद करून देशाप्रती प्रेम करण्याच्या उदात्त हेतूने प्रेरित योगेश चव्हाण कार्यरत आहेत. माझ्या कांजूरमध्ये प्रथमच ९६ सैनिकांचा सत्कार सोहळा हे काम शिवसैनिक करू शकतो याचा सार्थ अभिमान असल्याचे सांगितले.

म्युनिसिपल कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी महापौर मैदान माझ्या काळात झाले. त्यामुळे या कार्यक्रमात साजरा होतोय म्हणजे महापौरांचे आशीर्वाद आजच्या सत्कारमूर्ती सैनिकांच्या मागे आहेत. कदाचित आज मी सुद्धा तुमच्यासारखा सैनिक असलो असतो अशा आठवणी जाग्या करून तुम्हा सर्वाना वंदन करतो असे सांगितले. प्रारंभी गीता केरकर आणि गायक यांनी देशभक्तीपर गीते सादर केलीत. याप्रसंगी शाखाप्रमुख दीपक सावंत, उपविभागप्रमुख आनंद पाताडे, सुधाकर पेडणेकर, माजी शाखाप्रमुख तानाजी मोरे, विजय तोडणकर, बाबू ठाकूर, संघटक भरती शिंगोटे, प्रतिभा राणे आदी प्रभृती उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फिलिप रॉड्रिग्ज यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

मुंबई (गणेश हिरवे) शिक्षक नेते शिवाजी शेंडगे आयोजित नुकताच शिक्षक स्नेहमिलन कार्यक्रम दहिसर येथील पूजा हॉल मध्ये संपन झाला.यावेळ...