आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, २६ जानेवारी, २०२१

नेरुळ येथील कै. पंडीत रामा भगत उद्यानात हायमास्ट बंद अवस्थेत; नागरिकांची गैरसोय, चोरीचे व गर्दुल्लाचे प्रमाण वाढले

 

नवी मुंबई (प्रतिनिधी) :- उद्याने ही शहराचे वैभव असल्याने उद्यान विभागातील प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी ओळखून झोकून देऊन काम करावे व उद्यानांच्या स्थितीत आमुलाग्र सुधारणा घडवून आणावी असे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी  सूचित केले होते.

   दरम्यान, सेक्टर 12 नेरुळ येथील कै. पंडीत रामा भगत या उद्यानात हायमास्ट बंद अवस्थेत असल्यामुळे या परिसरात रात्रीच्या वेळेस खुप गडद अंधार होतो आणि याचाच फायदा घेऊन काही भुरटे चोर या प्रभागात चोरी करत आहेत त्यामुळे चोर्‍यांचे व गर्दुल्लाचे प्रमाण देखील विभागात वाढत आहे तसेच या अपुऱ्या प्रकाशामुळे जेष्ठ नागरीक, लहान मुले व महिला वर्गाला ये-जा करण्यास होणारा नाहक त्रास सहन करावा लागत आहे यावर महापालिकेने गांभीर्याने लक्ष देवून लवकरात लवकर कै. पंडीत रामा भगत उद्यानात हायमास्ट बनवून येथील नागरिकांना होणारा त्रास थांबवावा. तसेच, या बद्दल लेखी निवेदन नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव विरेंद्र म्हात्रे यांनी आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांना दिले आहे 

  उद्यानांची नियमित स्वच्छता आणि देखभाल तसेच तातडीने आवश्यक दुरूस्ती या महत्वाच्या बाबींची दक्षता घेत उद्यान सहाय्यकांनी आपापल्या क्षेत्रातील उद्यानांची स्थिती सुधारण्याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे, त्यासाठी दररोज उद्यानांना भेटी द्याव्यात व आवश्यक सुधारणा करून घ्याव्यात असे निर्देश या आधी ही महानगरपालिके चे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दिले होते. यापुढील काळात उद्यानांची स्थिती पाहण्यासाठी कुठेही अचानक भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करणार असून कामात निष्काळजीपणा आढळल्यास जबाबदारी निश्चित करण्यात येईल असे देखील स्पष्ट संकेत देण्यात आले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फिलिप रॉड्रिग्ज यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

मुंबई (गणेश हिरवे) शिक्षक नेते शिवाजी शेंडगे आयोजित नुकताच शिक्षक स्नेहमिलन कार्यक्रम दहिसर येथील पूजा हॉल मध्ये संपन झाला.यावेळ...