आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, २८ जानेवारी, २०२१

शिव शक्ती विकास मंडळ, आयोजित रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य "लकी-ड्रॉ सोडत" कार्यक्रम संपन्न !

मुंबई : (  दिपक कारकर )- गुहागर तालुक्यातील अंतिम टोकाचे गाव म्हणजे "भातगाव" होय.विविधतेने नटलेलं आणि कोकणची संस्कृती जोपासणाऱ्या या गावात अनेक वाड्या-मंडळे आहेत.या भातगाव तिसंग वेलेवाडी मधील कला/क्रिडा/सामाजिक/शैक्षणिक/सांस्कृतिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात नेहमीच अग्रेसर असणारे मंडळ म्हणजे "शिव शक्ती विकास मंडळ" होय.भातगाव पंचक्रोशीतील शिव शक्ती मंडळाची खास करून क्रिडा क्षेत्रातील कामगिरी देखील नेत्रदीपक ठरली आहे.मंडळाचा शिव शक्ती क्रिकेट संघ एक तालुक्यातील/पंचक्रोशीतील नावाजलेला क्रिकेट संघ असून प्रतिवर्षं तो चमकदार कामगिरी करताना दिसतो आहे.

उपरोक्त मंडळाने रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करत एक यशस्वी वाटचाल केली आहे.रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्यसाधून मंडळाने "भव्य हमखास बक्षिस सोडत" कार्यक्रम हाती घेऊन तो नुकताच कोव्हिड - १९ च्या दिवसांत शासकीय नियमांचे पालन करून विद्याधर मोहनजीनी वाडी हॉल,ठाकुरद्वार - मुंबई - ०२ येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व शिव शक्ती विकास मंडळाचे प्रेरणास्थान स्व.धाकुनाथ वेले यांच्या स्मृतीला उजाळा देत करण्यात आली.

    या कार्यक्रमाला भातगाव कुणबी मंडळाचे अध्यक्ष श्री मुरलीधर आग्रे,भातगावचे मानकरी श्री.महादेव आग्रे,सुप्रसिद्ध बेंजो मास्टर कु.सुरज वेले,पंचक्रोशी मंडळाचे अध्यक्ष श्री केतन तांबडकर,वाडीचे मानकरी श्री.रमेश वेले,गावकरी श्री.प्रकाश वेले,श्री पाणबुडी देवी कलांमच सदस्य- निलेश हुमणे,राजेंद्र नेवरेकर आदींची उपस्थिती लाभली.मंडळातर्फे मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

     या उपक्रमाला सहकार्य करणाऱ्या व लकी-ड्रॉ सोडत मधील सहभागी हितचिंतकांचे शाब्दिक आभार मानण्यात आले.व बक्षिसे विजयी असणाऱ्या सर्व बक्षिस दात्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.मंडळाच्या उन्नतीसाठी या नियोजित उपक्रमाचे शिलेदार असणारे शिव शक्ती विकास मंडळाचे अध्यक्ष दिनेश वेले,उपाध्यक्ष बाबाजी वेले, सेक्रेटरी पप्पू वेले,उपसेक्रेटरी दिलीप वेले व मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या अथक प्रयत्नांतुन हा सोहळा आनंदी वातावरणात पार पडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फिलिप रॉड्रिग्ज यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

मुंबई (गणेश हिरवे) शिक्षक नेते शिवाजी शेंडगे आयोजित नुकताच शिक्षक स्नेहमिलन कार्यक्रम दहिसर येथील पूजा हॉल मध्ये संपन झाला.यावेळ...