आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, २८ जानेवारी, २०२१

प्रजासत्ताक दिनी प्रेरणा फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

ठाणे /प्रतिनिधी : प्रेरणा फाउंडेशन रजि. ५६४/एफ३८७८४/ठाणे/महाराष्ट्र या सामाजिक संस्थेने २६ जानेवारी २०२१ रोजी  प्रजासत्ताक दिना निमित्ताने प्रेरणा फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण  सोहळा ११:०० ते ३:०० वाजता श्री. बल्लाळेश्वर हेंद्रेपाडा बदलापूर येथे धुमधडाक्यात  साजरा झाला. ह्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्रातील नामवंत सन्मानित १२० जणांना पुरस्कार देण्यात आला व या  सोहळ्याला २५०-३०० लोक  हजर होते. 

  या कार्यक्रमाचे आयोजन प्रेरणा फाउंडेशन च्या संस्थापिका/ अध्यक्षा दीप्ती (प्रेरणा) गांवकर यांनी फाउंडेशन चे सचिव वैभव कुलकर्णी व सह खजिनदार दिव्या गांवकर यांच्या सहकार्याने आयोजित केले.प्रेरणा  फाउंडेशन हे एक सामाजिक संस्था असून प्रत्येक क्षेत्रात  कार्यरत आहे. हे फाऊंडेशन गेले तीन वर्ष सतत गोर गरीब लोकांना, रस्त्यावरील भटकी लोकांना, अनाथांना आधार  देण्याचे काम करते. अनेक आदिवासी पाडे सुधारणे,  आदिवासी गावाला रस्ता,  वीज,  पाणी व लाईट याची सोय, नदया,  चौपाटी,  एस टी डेपो, रेल्वे  स्टेशन,रस्ते,  ठिकठिकाणी स्वछता अभियान राबविणे, अनेक अनाथालय, वृद्धाश्रम, अनाथ रस्त्यावरील  भटकी  मुले यांना सहारा व सहकार्य  देण्याचे काम करते. व तसेच प्रेरणा रंगमंच नाट्यमंडळ  व प्रेरणा युट्युब अंतर्गत दिग्दर्शिका/ नाटककार दीप्ती  (प्रेरणा) गांवकर स्वतः  कॅन्सरग्रस्त लोकांना आधार देण्याचे काम करतात.

   या कार्यक्रमात  प्रमुख पाहुणे ईंटेग्रेवोन कंपनी चे मॅनेजर व उत्कृष्ट समाजसेवक  श्री. संजीव सुरेशचंद्र जैन, दीनदयाळ कुष्ठरोग संस्था अंबरनाथ अध्यक्ष श्री. अविनाश म्हात्रे, सुपरस्टार ऑल सोशल मीडिया पत्रकार संघटना श्री.  बाळासाहेब भालेराव, शहर अध्यक्षा सौ. सुजाताताई भोईर,  पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष श्री. अशोक म्हात्रे अश्या प्रसिद्ध मान्यवर व प्रेरणा फाउंडेशन संस्थापिका/ अध्यक्षा दीप्ती (प्रेरणा) गांवकर अशा  मान्यवरांच्या हस्ते सावित्री जोतिबा  वारसा पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार,  रणरागिणी पुरस्कार, साहित्यिक पुरस्कार, ई.  तसेच २०२० कोरोना च्या लॉक डाऊन काळात ज्या व्यक्ती आणि  सामाजिक संस्थांनी अहोरात्र गोर गरीब लोकांना व कोरोना च्या काळात नौकरी गेलेल्या लोकांना धान्य वस्तू स्वरूपात व आर्थिक स्वरूपात  आदिवासी लोकांना, भटकी लोकांना  मदत केली अशा  मान्यवरांना  कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रेरणा फाउंडेशन संस्थापिका/ अध्यक्षा दीप्ती (प्रेरणा) गांवकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.  या कार्यक्रमात सुपरस्टार ऑल सोशल मीडिया पत्रकार संघटना तर्फे प्रेरणा फाउंडेशन संस्थापिका/ अध्यक्षा दीप्ती (प्रेरणा) गांवकर यांना ठाणे पत्रकार जिल्हा महिला अध्यक्षा म्हणून नेमणूक करण्यात आली, वैभव कुलकर्णी यांना ठाणे जिल्हा उपाध्यक्ष, दिव्या गांवकर यांना ठाणे जिल्हा सचिव, दिलेश देवडी यांना ठाणे जिल्हा सहसचिव म्हणून नेमणूक करण्यात आले.  तसेच प्रेरणा फाउंडेशन संस्थापिका/ अध्यक्षा दीप्ती (प्रेरणा) गांवकर यांना सेवक सेवा भावी संस्था जळगांव यांच्या तर्फे महाराष्ट्र गौरव पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले. यावेळी  सौ. वैशाली विनायक चांदेकर, माधुरी बोन्डाले, प्रतिभा केसरकर यांनी फाउंडेशन ला दिलेली  मदत एकत्रित करून जालना येथील दिव्यांग आकाश देशमुख याला मदत म्हणून देण्यात आली.

  या कार्यक्रमाचे कु. दिव्या गांवकर यांनी  पूर्ण सूत्रसंचालन अगदी जबाबदारी पूर्वक निभावले व सुंदर आवाजात गीत ही सादर केले. तसेच श्रेया शिंपी अंधत्वावर मात करणारी या लहान मुलीने सुंदर गाणं सादर केले, निकिता दीपक परब या मुलीने प्रजासत्ताक दिनाचे भाषण व गीत सादर केले.  प्रेरणा फाउंडेशन सचिव यांनी प्रेरणा फाउंडेशन च्या कार्याचे प्रास्ताविक सादर केले.प्रेरणा फाउंडेशन संस्थापिका/ अध्यक्षा दीप्ती (प्रेरणा) गांवकर यांनी प्रेरणा फाउंडेशन या छोटयाश्या रोपट्याचे आज कल्पवृक्ष कसे झाले याची माहिती व मागदर्शन केले .याप्रसंगी  सर्व प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना थोडक्यात  मार्गदर्शन केले. 

 या कार्यक्रमास सहसचिव दिलेश रमेश देसाई, सभासद सौ. रेशमा रमेश देसाई, अवधूत शेलार, निकिता दीपक परब, दीक्षिता  दीपक परब, ऋषिकेश रमेश देसाई, सुनील गांवकर,  विकास पवार या सर्वांचे बहुमूल्य सहकार्य लाभले. शेवटी  सर्वांचे  दिव्या गांवकर यांनी सर्वांचे आभार मानून, अल्पोउपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फिलिप रॉड्रिग्ज यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

मुंबई (गणेश हिरवे) शिक्षक नेते शिवाजी शेंडगे आयोजित नुकताच शिक्षक स्नेहमिलन कार्यक्रम दहिसर येथील पूजा हॉल मध्ये संपन झाला.यावेळ...