मुंबई : जी हृदयात राहत होती ती एकच मूर्ति होती, जी जगण्याची प्रेरणा देत होती ..जिच्या वैखरीतून सरस्वती वदत होती अशी मूर्तीमंत पवित्र मूर्ती म्हणजे आमचे सर्वांचे लाडके निवेदक मित्रं.. चतुरस्र आणि हरहुन्नरी कलावंत कै.तपस्वी परशुराम राणे (लाडके तपूदादा) ज्यांचा मोलाचा सहवास हरवला, त्यांच्या अचानक जाण्याने राणे कुटुंबीयांत...वाद्यवृंद क्षेत्रांत , कलाक्षेत्रात तसेच सिने नाट्य सृष्टीत कमालीची पोकळी निर्माण झालेली आहे.. त्यांची आठवण हीं कायमस्वरूपी स्मरणात रहावी या हेतूने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि सोशल डिस्टन्सचे भान ठेवून रविवार दिनांक २९ नोव्हेंबर रोजी राशी स्टुडिओ, करिरोड, मुंबई ४०० ०१२ येथे सकाळी ११.०० ते दुपारी २.०० च्या दरम्यान शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यां शोकसभेत अनेक दिग्गज कलावंतांनी कै.तपस्वी राणे यांना सुमनांजली वाहून श्रद्धांजलीपर आपली मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी ज्येष्ठ संगीत संयोजक अशोक वायंगणकर, ज्येष्ठ शाहीर कृष्णा खामकर, ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शक सदानंद राणे, निवेदक उमेश सावंत, दिग्दर्शक महेश्वर तेटांबे, अभिनेते विलास (बाळा) चौकेकर, जयवंत भालेकर, प्रशांत भाटकर, निर्माता सचिन पाताडे, अभिनेत्री उषा साटम, नैना राणे, लावणी सम्राज्ञी मेघा करंगुटकर, कला दिग्दर्शक सुनिल देवळेकर, राकेश शेळके, माझगाव डॉकचे विनय आपटे, तपस्वी बंधू भगवान (सुरू) राणे आदी सर्व कलावंत..तंत्रज्ञ.. वाद्यवृंद कलावंत उपस्थित होती.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान
मुंबई (गणेश हिरवे) दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
मुंबई दि. २० (अधिराज्य) प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली १९८४ साली पक्षाची जी पुनर्बांधणी झाली तेव्हापासून बाळासाहेबांच्या ...
-
मुंबई(उदय दणदणे) महाराष्ट्रातील लोककला परंपरेतील कोकणातील कलगी तुरा लोककला व लोककलावंतांची मातृसंस्था- "कलगी तुरा समाज उन्न...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा