मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील उद्याने,चौक,वाहतूक बेटे,महत्त्वाचे रस्ते,महत्त्वाची ठिकाणे येथे विविध थोर राष्ट्रपुरूषांचे पुतळे (पुर्णाकृती-अर्धा कृती) त्यांचे जनतेसमोर चिरंतन रहावे म्हणून उभारले जातात. मुंबईत असे अनेक पुतळे आहेत. परंतु त्यांच्या कार्याची,त्यागाची माहिती आजच्या आणि येणार्या पिढीला व्हावी म्हणून मुंबई महानगरपालिकेने आपल्या २४ विभाग कार्यालयाच्या कार्य कक्षेत असलेल्या पुतळ्यांच्या छायाचित्रासह पुतळ्यांची माहिती संग्रहीत करून पुस्तिका काढावी .
पुतळ्याजवळ त्यांचे नाव आहे.त्यांनी देशासाठी केलेला त्याग,त्यांच्या कार्याची माहिती नसते.त्यांच्या कार्याची माहिती जनतेला व्हावी म्हणून ती संग्रह रूपाने पुस्तिका तयार करावी.ती जनतेला ,विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना उपयोगी पडेल. पुस्तिका विक्री साठी उपलब्ध असावी.पुतळा का उभारला हे पुस्तिका वाचल्यावर समजून येईल.
मुंबई महानगरपालिकेला विनंती आहे की महापालिकेच्या जनसंपर्क विभागाला पुतळ्यांची माहिती पुस्तिका तयार करण्याची व विक्री करण्याची परवानगी द्यावी. पुस्तिका जनसंपर्क विभाग कार्यालयात विक्रीसाठी ठेवावी.त्याचा फायदा मुंबईकरांना, लोकप्रतिनिधीना,मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना, अभ्यासकांना होईल तसेच, मा.महापौर,मा.आयुक्त यांच्या भेटीसाठी परदेशी पाहुणे येतात त्यांना भेट म्हणून पुस्तिका देता येईल.
म्हणून मुंबईतील पुतळ्यांची माहिती पुस्तिका काढावी अशी विनंती आहे.
-महादेव गोळवसकर
शीव मुंबई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा