आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, ४ जुलै, २०२०

पोलीस सेवा संघटनेच्या महाराष्ट्र राज्य युवक उपाध्यक्षपदी चित्रपट अभिनेता विनायक जयकर

ठाणे - विविध सामाजिक व संस्कृतिक संघटने मध्ये चांगल्या प्रकारे सहभाग असणारे व समाज कार्याची आवड असणारे आणि चित्रपट व मालिकांमध्ये अभिनय करत असलेले विनायक जयकर यांना पोलीस संघटनेत काम करण्याची जिद्द आहे.
   संघटनेने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची पोलीस सेवा संघटना महाराष्ट्र राज्य युवक उपाध्यक्षपदी निवड केली आहे.
हि निवड शिवराज्य कामगार हक्क संघटना महाराष्ट्र राज्य सलग्न पोलीस सेवा संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष प्रकाश डोंगळे,उपाध्यक्ष धर्मेंद्र आगरवाल,सरचिटणीर अनिल सूर्यवंशी व इतर पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार झालेल्या बैठकीमध्ये करण्यात आली.

चित्रपट अभिनेते विनायक जयकर यांच्या निवडीमुळे नाट्य व चित्रपट कलाकारांनी तसेच समाजातील अनेकांनी त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

ईबीडी बुद्धिबळ स्पर्धेत धनश्री बुद्धिबळ अकादमीच्या स्मित, शुभम आणि विवानचे निर्भेळ यश

मुंबई: (प्रेम पंडित )- धोरणात्मक कौशल्य आणि तरुण बुद्धिमत्तेचे उत्कृष्ट प्रदर्शन करत ईबीडी बुद्धिबळ स्पर्धा (EBD Chess Tournamen...