आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, १८ जून, २०२०

कोरोना योद्धा : निसार अली


     २४ मार्च पासून लॉकडाउन सुरू  झाल्याने सुरुवातीला काय करावे हे समजत नव्हते. तसेच कोरोनाची भीती मुळे बाहेर पडायची हिम्मत होत नव्हती. आमचा मालवणी परिसर तसा दाटीवाटीचा, मुंबईच्या मालाड स्टेशन पासून लांब असलेला. मराठी,मुस्लिम, ख्रिश्चन, उत्तर भारतीय अशी मिश्र वस्ती असलेली वसाहत, या लोकांची चार दिवसातील परिस्थिति बघता मन अस्वस्थ झाले होते. त्यातच  पत्नी वैशाली ही मधुमेह आणि जास्त रक्तदाबाचा त्रास असल्याने आजारी. आपण मदतीकरिता घराबाहेर  पडलो तर त्याचे परिणाम तिच्या आरोग्यावर व 12 वर्षीय मुलगी ईशाच्या आरोग्यावर होण्याची भीतीपोटी पाऊल पुढे पडत नव्हते. त्याच वेळी राष्ट्र सेवा दलाचे संस्कार घरीही बसून देत नव्हते. मालवणी मध्ये आम्ही राष्ट्र सेवा दलाची शाखा चालवितो, सेवा दलाचे ऑफिस आहे, चांगली टीम आहे आणि तरीही आम्ही काही करीत नाही ही खंतही होती. अशा वेळी माझी पत्नी वैशाली महाडिक आणि सेवादलाचे मित्र , साक्षर वेल्फेअर सोसायटीचे सर्व सहकारी यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे हिम्मत करत आम्ही दोघे बाहेर पडलो. राष्ट्र सेवा दलाचे मालवणी,     मालाड विभागाचे संघटक निसार अली सांगत होते.
  लॉकडाऊनच्या काळात सुरवातीपासून आजतागायत काम करणारे निसार अली आणि वैशाली महाडिक हे सेवा दलातले कार्यकर्ता जोडपे. आंतर धर्मीय लग्न केलेले, विचाराने पक्के, डॉ.दाभोलकरांची हत्या झाल्यानंतर मालवणीच्या रस्त्यावर विवेक जागर परिषद भरविणारे निसार आणि वैशाली.
     बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी मधील थोडी रक्कम बाजूला काढण्याचे आवाहन मुस्लिम समाजातील तरुणांना करून, ती रक्कम सातारा जिल्ह्यातील  दुष्काळी गावात जाऊन पोहचवून तसेच गेल्या वर्षी कोल्हापूर भागात आलेल्या पुराच्या वेळी पूरग्रस्त बांधवांना मदत  देण्यासाठी पुढाकार घेणारे निसार अली या कोरोनाच्या काळात घरी कसे बसतील?
      मार्चच्या शेवटच्या आठवड्यात साक्षर वेलफेअर सोसायटी या संस्थेच्या व सेवा दलाच्या माध्यमातून  सुरवातीला त्यांनी 15 गरजुंना  रेशन मिळवून दिले. मात्र परिस्थिति बिकट होत असल्याने स्वतः अनेक संस्थाशी संपर्क केला व गरजुंना रेशन मिळवून देण्यास सुरुवात केली. मात्र तरी काही रोजंदारीवर काम करणारे मजूर, कारागिर, घरेलू काम करणाऱ्या महिला, सुरक्षा रक्षक, रिक्षा, टॅक्सी चालक, अशा अनेक लोकांची परिस्थिति बिकट  होत असल्याने त्यांना शिजवलेल्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी 30 मार्च पासून अवघे 32 फूड पाकिट मिळवून  कामाला सुरुवात केली. हळूहळू 32 पाकीटाचे  700 पाकिटे कधी झाले ते त्यांना कळलेच नाही. यात साक्षर या  संस्थेने जेवण पुरवले.
     अनेक दिवसांपासून सरकार , पालिका, परिसरात sanitization बाबत काहीतरी करेल असे वाटत होते. मात्र काहीच हालचाल होत नव्हती  आणि नागरिक कोरोना मुळे धास्तावले होते. अशा परिस्थितीत *अपनी सुरक्षा अपने हाथ* ही मोहीम राबवत त्यांनी  स्वखर्चाने २ sanitization मशीन विकत घेतल्या व केमिकल खरेदी करून स्वतः, ते त्यांची पत्नी वैशाली व काही  सहकारी, सुरेश शेलार, फारूक अली सय्यद ,सुमित कनोजिया यांच्या सहकार्याने sanitization  मोहीम त्यांनी सुरु केली. बघता बघता sanitization  करण्याची मागणी वाढत गेली व लोक जोडत गेले. यात महिला ही पुढे आल्या व त्यांनी ही स्वतःच्या वस्तीचे sanitization करण्यास सुरु केली.हे करताना जाणवले की आपण सर्वत्र पोहचु शकत नाही मग त्यांनी ठरवले की प्रत्येक घरात जावून लोकांना sanirization च्या गोळ्या देवून त्यांना स्वतःच्या घर, परिसर sanitization करण्यासाठी प्रेरित करायचे.  त्यासाठी पुन्हा स्वखर्चाने गोळ्या मागवुन  जवळ पास 500 घरात त्यांनी गोळ्यांचे वाटप केले.
   तसेच या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी  रक्तदानाची गरज असल्याचे माध्यमातून  सांगितले. मग  दिनांक 12 जून रोजी जसलोक हॉस्पिटलच्या मदतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले व त्यात 55 नागरिकांनी रक्तदान केले विशेष म्हणजे यात मुस्लिम तरुणांची संख्या लक्षणीय होती. वस्ती मध्ये घरोघर जावून Temprature चेक करण्याचे काम दोन आठवड्यापासून  त्यांनी सुरु केले आहे. मालवणी ही चिंचोळ्या गल्ल्यांची दाटीवाटीने वसलेली वसाहत, घराघरात जाऊन महापालिकेच्या मदतीने कोरोना suspect शोध मोहीम घ्यायची आहे. त्यासाठी पालिकेच्या सहाय्यक आयुक्त यांच्याशी  प्राथमिक बोलणी केलेली आहेत.असे निसार अली यांनी सांगितले.
    केरळ  सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी पाठविलेले मास्कचे वितरण त्यांनी केले आहे. सेवा दलाच्या मध्यवर्तीने  पाठविलेले तांदुळ हे गरजू पर्यंत पोहचविले आहेत. Physical distancing बाबत जनजागृति सुरू आहे. त्याच बरोबर  कल्याण, डोम्बिवली,जोगेश्वरी, बोरीवली, माटुंगा,गोरेगाव पूर्व येथील काही गरजू साठी कड़क लॉक डाउन असताना ही रेशनची मदत त्यांनी मिळवून दिली आहे. काही कोरोना रुग्णांना बेड मिळवून देण्यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून बेड मिळवून दिले आहेत.
     आता पर्यंत त्यांनी 800 गरजूंना अन्नधान्याचे वाटप केले आहे.6 जून हा त्यांच्या लग्नाचा वाढदिवस गेली कित्येक वर्ष ते आपला लग्नाचा वाढदिवस बाहेर जावून किंवा कुटुंबाला वेळ देवून साजरा करीत होते पण यंदा त्यांचा वाढदिवस त्या दोघांनी मालवणी,मालाड मध्ये sanitization आणि टेंपरेचर चेक करून आणि गरजूंना धान्य वाटप करून साजरा केला.
  
   सानेगुरुजींच्या, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे या भावनेने काम करणाऱ्या निसार आणि वैशाली यांना सलाम !
----------------------------------------
आपल्याला निसारच्या कामाची दखल घ्यावीशी वाटली तर संपर्कासाठी ......
निसार अली :9967518107

२ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

आदर्श वार्ताहर खूप छान आहे.माझे नाव चंद्रशेखर जाधव असे आहे.मला पत्रकारितेतील अनुभव आहे, स्वरचित कविता आहेत. सामाजिक कार्यकर्ता म्हणून मालाड (पु) येथे कार्यरत आहे. माझे तुमच्या या उपक्रमाला सहकार्य असेल. माझा संपर्क क्र 8879549294 असा आहे.

Unknown म्हणाले...

आदर्श वार्ताहर खूप छान आहे.माझे नाव चंद्रशेखर जाधव असे आहे.मला पत्रकारितेतील अनुभव आहे, स्वरचित कविता आहेत. सामाजिक कार्यकर्ता म्हणून मालाड (पु) येथे कार्यरत आहे. माझे तुमच्या या उपक्रमाला सहकार्य असेल. माझा संपर्क क्र 8879549294 असा आहे.

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर)  शिवसेना सचिव,प्रवक्ता,मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर ...