आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, १८ जून, २०२०

कोरोनासारखी लक्षणे असलेल्या ब्रुसेला न्युमोनिया बाधित रुग्णावर चेंबुर येथील झेन हॉस्पीटलमध्ये यशस्वी उपचार : ४९ वर्षीय रुग्ण ठणठणीत बरा - ब्रुसेला न्युमोनिया या विषाणुजन्य आजारावर यशस्वी मात


मुंबई(शांत्ताराम गुडेकर) 

       एकीकडे संपुर्ण जगभरात कोरोनाचे संकट पसरले असून नागरिकांमध्ये या आजाराविषयी भिती निर्माण झाली आहे. कोरोनाची लक्षणे,काळजी याविषयी विविध स्तरातून जनजागृती करण्यात आली असून ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, श्वासोच्छवासात अडथळे येणे आदी लक्षणे दिसल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेऊन कोविड-१९ ची चाचणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अशीच लक्षणे आढळल्याने ४९ वर्षीय गृहस्थाला चेंबूर येथील झेन हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र या रुग्णाच्या कोविड-४९ संबंधी सर्व चाचण्या निगेहिव्ह दर्शविण्यात आल्या. तपासणीअंती या रुग्णाला ब्रुसेला न्युमोनिया अशा प्राण्याच्या प्रजातींपासून होणारा विषाणुजन्य आजाराची लागण झाल्याचे समजले. डॉक्टरांच्या यशस्वी उपचारानंतर हा रुग्ण आता पुर्णपणे बरा झाला असून चेंबूर येथील झेन हॉस्पीटलमध्ये यशस्वी उपचार करण्यात आले.

           झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चेंबूरचे सल्लागार डॉक्टर, इंटेसिव्हिस्ट आणि संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. विक्रांत शहा यांनी सांगितले की,  रुग्णाला हॉस्पीटलमध्ये दाखल केल्यानंतर सुरुवातील कोविड-१९  साठी प्राथमिक स्वॅब टेस्ट करण्यात आली आणि या तपासणीचा अहवाल निगेटिव्ह दर्शविण्यात आला.  मात्र या रुग्णाला ९ व्या दिवशीही ताप,अतिसार, श्वासासंबंधी तक्रारी दिसून आल्या. वारंवार तपासणी करुनही त्याच्या अहवालामध्ये डब्ल्युबीसी, प्लेटलेट्स आणि लिम्फोसाईट्सचे प्रमाण मात्र कमी झाल्याचे दिसून येत होते. आणि कोविडचा अहवाल देखील पुन्हा निगेटिव्ह दर्शविण्यात आला.त्यानंतर या रुग्णाची लक्षणे पाहता तपासणीअंती  या रुग्णाला ब्रुसेला न्युमोनियाचे निदान झाले. ब्रुसेलोसिस ही ब्रुसेला या जीन्समुळे होणारी झुनोटिक बॅक्टेरियाचा संसर्ग आहे. हा संसर्ग सामान्यत: दूषित प्राण्यांशी थेट संपर्क साधून किंवा अनपाश्चराईज्ड दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनाने आणि संसर्गजन्य हवेतील कणांच्या माध्यमातून श्वासोच्छवासाद्वारे त्याचा प्रसार होतो. यामध्ये थकवा, ताप,  अंगदुखी आदी लक्षणांचा समावेश आहे. ताप हे या आजाराचे सर्वसामान्य लक्षण आहे.
  डॉ. विक्रांत शहा यांनी असेही म्हटले आहे की, कोरोना सारख्या विषाणुज्य बाधितांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या पाहता त्यांच्यावर उपचार करताना सारखीच लक्षणे आढळणा-या इतर आजाराचे निदान करणे मग त्यावर उपचार करणे आणि रुग्णाला ठणठणीत बरे करणे हे देखील एक आव्हानच होते. आता रुग्ण बरा झाला असला तरी त्याला यापुढे सुरुवातीला तीन आठवड्यांनी फॉलोअप्स करणे त्यानंतर सहा आठवडे, मग तीन महिने आणि त्यानंतर सहा महिन्यांनी पुन्हा तपासणी करण्यास सांगितल्याची माहिती डॉ .शहा यांनी दिली.
    रुग्णांने मत व्यक्त करताना सांगितले की, मला स्वतःमध्ये कोरोनाही लक्षणे दिसू लागली तेव्हा मात्र मी खुपच घाबरलो होत. माझे कुटुंबिय देखील माझ्या आजारपणामुळे घाबरले होते. मी त्वरीत चेंबुर येथील झेन हॉस्पीटलमध्ये धाव घेतली आणि आता मात्र मी ठणठणीत बरा झालो आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गरिबांची दिवाळी गोड होण्यासाठी सामाजिक संस्था पुढे सरसावल्या

दरवर्षी दिवाळी आणि इतर सणांनिमित्त आनंदाचा शिधा रेशन दुकानांवर शासनाकडून देण्यात येतो, पण यंदा तो देण्या...